योग्य वेळीच निवृत्त होईन – युवराज सिंह


नवी दिल्ली – एकीकडे नवोदीत खेळाडू भारतीय संघात आपली जागा पक्की करण्यासाठी धडपडत असताना; युवराज सिंह आणि सुरेश रैनासारख्या खेळाडूंच्या कारकिर्दीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाळे आहे. मोठ्या कालावधीनंतर आफ्रिकेविरुद्ध टी-२० मालिकेसाठी सुरेश रैनाने भारतीय संघात पुनरागमन केले आहे. पण अजुनही डावखुरा अष्टपैलू खेळाडु युवराज सिंह भारतीय संघाच्या बाहेर आहे. अनेकांनी युवराज आणि रैनाला वाढते वय आणि बिघडत चाललेला फॉर्म पाहता निवृत्ती घेण्याचा सल्ला दिला. पण भारतीय संघात पुनरागमन करण्याची आशा ३६ वर्षीय युवराज सिंहने अजुन सोडलेली नाही.

युवराज सिंहने एका संकेतस्थळाला दिलेल्या मुलाखतीत आपल्या निवृत्तीविषयीचं मत मांडले आहे. मला कोणतीही गोष्ट मनात ठेवून निवृत्ती स्विकारायची नाही. निवृत्तीनंतर माझ्या मनात एखादी गोष्ट करायची राहून गेली असा विचार येऊ द्यायचा नाही. मी माझी सर्वोत्तम खेळी ज्यावेळा करेन आणि आपण यापुढे क्रिकेट खेळू शकणार नाही असे मला वाटेल, त्यावेळी मी स्वतःहून निवृत्त होईन.

आतापर्यंतचा माझा प्रवास नक्कीच चांगला झाला. आतापर्यंत अनेक संकटांचा सामना मी माझ्या कारकिर्दी दरम्यान केला आहे. संघात कॅन्सरवर मात करुन पुनरागमन केल्यानंतर माझे आयुष्य इतरांसाठी प्रेरणादायी ठरावे असे मला नेहमी वाटत राहिलेले आहे. मला यापुढच्या काळात जेव्हा कधीही खेळण्याची संधी मिळेल त्यावेळी मी १०० टक्के प्रयत्न करुन चांगली कामगिरी करण्याचा प्रयत्न करणार आहे.

Web Title: Will retire at the right time - Yuvraj Singh