तुम्ही पाहिला आहे का वरुण-अनुष्काचा गावठी लूक


‘सुई धागा’ चित्रपटाच्या निमित्ताने बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि वरुण धवन यांना पहिल्यांदाच एकत्र पाहण्याची संधी चाहत्यांना मिळणार असून चित्रपटाचा फर्स्ट लूक नुकताच रिलीज करण्यात आला. आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन वरुण धवनने एक फोटो शेअर केला आहे, अनुष्का शर्माही ज्यामध्ये दिसत आहे. चित्रपटातील दोघांचाही लूक अत्यंत साधा असणार असल्याचे पोस्टवरुन दिसत आहे. साधे कपडे दोघांनीही घातले असून, त्यात ते ग्रामीण अवतारात दिसत आहेत. चित्रपटाबद्दलची उत्सुकता त्यांच्या या फोटोमुळे अजून वाढली आहे.


वरुण धवनने चित्रपटाचा फर्स्ट लूक शेअर करताना लिहिले आहे की, ‘एक्स्क्लूझिव्ह – मौजी आणि ममतला २८ सप्टेंबरला भेटा’. वरुण धवनच्या कॅप्शनवरुन तरी चित्रपटात वरुण मौजी आणि अनुष्का ममताची भूमिका साकारणार हे नक्की आहे. चित्रपटातील दोघांचाही लूक एकदम साधा आणि त्यांनी आतापर्यंत निभावलेल्या भूमिकांपेक्षा वेगळा आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन शरत कटारिया करत असून हा चित्रपट २८ सप्टेंबरला रिलीज होणार आहे.