आजपासून राम राज्य रथयात्रेस अयोध्येतून सुरूवात


अयोध्या – आता अंतिम टप्प्यात राम जन्मभूमी-बाबरी मशीद प्रकरणातील सुनावणी असून तत्पूर्वीच आजपासून (मंगळवार) राम राज्य रथयात्रेचा शुभारंभ अयोध्यातून होणार आहे. तामिळनाडूतील रामेश्वरम येथे ही यात्रा संपणार असून ही यात्रा दोन महिन्यात सहा राज्यातून प्रवास करेल.

रथाचे स्वरूप एका टाटा मिनी ट्रकला देण्यात आले असून भाजपशासित उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, महाराष्ट्राशिवाय काँग्रेस शासित कर्नाटकमधून ही यात्रा जाणार आहे. यावर्षी कर्नाटकमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. भाजपचे हे राज्य मिळवण्याचा शर्थीचे प्रयत्न सुरू असून अंतिम टप्प्यात ही यात्रा केरळमधून जाईल. भाजप या राज्यात आपले पंख पसरवू पाहत आहे. महाराष्ट्रातील एका सामाजिक संघटनेद्वारे अधिकृतरित्या ही रथयात्रा आयोजित करण्यात आली आहे. राष्ट्रीय स्वंयसेवक संघ-भाजपशी वैचारिक साम्य असणारे विश्व हिंदू परिषद आणि मुस्लिम राष्ट्रीय मंच सारख्या संघटना यामध्ये सहभागी होत आहेत.

Web Title: The Ram Rajya Yatra Starting today from Ayodhya