शाहरुखने ट्विटरवर ओलांडला ३ कोटी ३ लाखांचा टप्पा


ट्विटरवर किंग खान शाहरुखच्या फॉलोअर्स संख्येमध्ये कमालीची वाढ झाली असून ट्विटरवर बॉलिवूडच्या या बादशाहचे चक्क ३.३ कोटी एवढे फॉलोअर्स झाले आहेत. शाहरुखने ट्विटरवर फॉलोअर्स वाढल्याने एका अनोख्या पद्धतीने चाहत्यांचे आभार मानले आहेत. त्याच्या ट्विटर अकाऊंटवरून एक व्हिडिओ शाहरुखने शेअर केला आहे.


चाहत्यांचे आभार मानण्यासाठी शाहरुखने चक्क स्वीमिंग पूलमध्ये उडी मारली आहे. शाहरुख या व्हिडिओमध्ये महागडा सुट आणि काळ्या रंगाच्या गॉगलमध्ये दिसतो आहे. हा व्हिडिओ शेअर करताना मी कधीच नियोजन करुन काम करत नाही पण आज मात्र मी ठरवून तुमच्यासाठी एक गोष्ट करत असल्याचे शाहरुखने म्हटले आहे. फॉलोअर्सची वाढती संख्या पाहून शाहरुख फारच खूश दिसतो आहे.