गुगल सर्च ट्रेंडमध्ये प्रिया वारियरने पटकवले अव्वल स्थान


मल्याळम अभिनेत्री प्रिया प्रकाश वारियर एका गाण्यातून रातोरात स्टार झाली असून यावर्षीच्या गुगल सर्च ट्रेंडमध्ये तिने अव्वल स्थान पटकावत सनी लिओन, कतरिना कैफ, आलिया भट्ट यांना मागे टाकले आहे.

प्रिया वारियरच्या अदा गेले दोन दिवस सोशल मीडियावर व्हायरल होत असतानाच या व्हिडीओचे आता असंख्य मिम् तयार होताना दिसत आहेत. तिच्याच नावाचा बोलबाला गुगलवरही असून, तिच्या नावाने गुगल सर्चमध्ये सर्च करण्याचे प्रमाण सर्वाधिक आहे. एवढेच काय तर ट्विटरवरही तिच्या फॉलोअर्सची संख्या झपाट्याने वाढत आहे. प्रिया प्रकाश वारियर ही ‘ओरु अदार लव’ (Oru Adaar Love) या मल्याळम् चित्रपटातून पदार्पण करणार आहे. ती त्याआधीच सर्वत्र लोकप्रिय झाली आहे. तिने या गाण्यात ज्या प्रकारे तिच्या प्रियकराला डोळा मारला आहे, त्या अदांवर सगळी तरूणाई फिदा झाली आहे. यावर्षी गुगल ट्रेंडमध्ये सर्च केलेल्या नावांमध्ये प्रिया वारियरचे नाव पहिले येते.