फिलिपिन्सचे राष्ट्राध्यक्ष म्हणतात; बंडखोरी करणाऱ्या महिलांच्या गुप्तांगावर गोळ्या घाला


मनिला – फिलिपिन्सचे राष्ट्राध्यक्ष रॉड्रिगो ड्युटर्टी यांनी बंडखोर महिलांच्या गुप्तांगावर गोळ्या घाला, असे वादग्रस्त वक्तव्य केले आहे. जगभरातील महिलांनी त्याच्या या आक्षेपार्ह वक्तव्यावर तीव्र नाराजी दर्शवली आहे. राष्ट्राध्यक्षांची हीन मानसिकता यातून दिसून येत असून देशातील नागरिकांना स्त्रियांवर अत्याचार करण्यासाठी ते अधिक भडकवत असल्याचा आरोप महिला संघटनांनी केला आहे.

त्यांनी गेल्याच आठवड्यात २०० सैनिकांना संबोधित करताना वादग्रस्त वक्तव्ये केली आहेत. त्यांनी सैनिकांसमोर बोलताना बंडखोर महिलांना सांगा की आम्ही तुम्हाला मारून टाकणार नाही. त्याऐवजी तुमच्या गुप्तांगावर गोळ्या घालू कारण योनीशिवाय स्त्रीला महत्त्व नाही. मेयर कडून ही आज्ञा आली असल्याचेही त्यांना सांगा अशी मुक्ताफळे उधळली आहेत. याबाबत एका इंग्रजी दैनिकाने दिलेल्या माहितीनुसार सैनिक रॉड्रिगो यांचे वादग्रस्त वक्तव्य ऐकून चिडण्याऐवजी हसून त्यांना दुजोरा देत होते. द गार्डियनने दिलेल्या माहितीनुसार एका अमेरिकन वृत्तपत्राच्या माहितीनुसार महिलांचा अपमान करण्यास, त्यांना धमकावण्यात रॉड्रिगो हे कधीही कचरत नाहीत. त्यांच्याकडून वारंवार महिलांवर अशी आक्षेपार्ह शेरेबाजी केली जाते.