१५ फेब्रुवारीपासून बेस्टचे कर्मचारी संपावर?


मुंबई : १५ फेब्रूवारीपासून बेस्टचे कर्मचारी संपावर जाण्याची शक्यता असल्यामुळे मुंबईकरांचे हाल होण्याची शक्यता आहे. कामगार संघटनेने बेस्टच्या खाजगीकरणाविरोधात बंदचे आवाहन केले आहे. बेस्टचे कर्मचारी गेल्या काही महिन्यांपासून प्रशासनाच्या धोरणावर नाराज आहे. पगारांची होत असलेली चालढकल आणि त्यातच काही बसेस बंद केल्या. त्यामुळे कर्मचारी संतापलेले आहेत.

४५० बसगाड्या आणि कामगार भाड्याने घेण्याचा प्रस्ताव बेस्ट समितीच्या सभेत बेस्ट समितीने मंजूर केल्याच्या विरोधात १५ फेब्रूवारीपासून बंद करण्याचे आवाहन केले आहे. कामगारांनी स्वतःहून बंद पाळण्याचे बेस्ट संयुक्त कामगार कृति समितीने कर्मचा-यांना आवाहन केले आहे.

Web Title: Mumbai Best Employee strike from Feb 15?