कपिलच्या नवीन शोचे नामकरण


लवकरच एका नव्या शोद्वारे विनोदाचा बादशहा कपिल शर्मा प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून या शोचो पहिला प्रोमो काही दिवसांपूर्वी प्रदर्शित करण्यात आला होता. पण शोचे नाव या प्रोमोमधून सांगण्यात आले नव्हते. पण कपिलने नुकतेच फेसबुकवर लाइव्ह चॅट केले. त्याने शोच्या नावाचा खुलासा या चॅटमध्येच केला.


कपिलने शोचे नाव फॅमिली विथ कपिल शर्मा असे असल्याचे लाइव्ह चॅटमध्ये सांगितले. यावेळच्या शोमध्ये थोडा बदल करण्यात आला आहे. या शोमध्ये वेगवेगळ्या शहरांमधील लोक प्रेक्षक म्हणून सहभागी होऊ शकतील. कपिलने फेसबुक चॅटदरम्यान हेही स्पष्ट केले की, सध्या तरी हे नाव निश्चित करण्यात आले आहे. पण भविष्यात शोचे नाव बदलूही शकते.