तुम्ही पाहिले आहे का सलमान आणि सोनाक्षीचे नवे रोमँटिक गाणे ?


दबंग आणि दबंग २ या चित्रपटात आपण सलमान खान आणि सोनाक्षी सिन्हा ही जोडी पाहिली होती. सगळ्यांनाच त्यांची ऑन स्क्रिन केमेस्ट्री आवडली होती. सोनाक्षीचा हा पहिलाच चित्रपट होता. ही जोडी पुन्हा एकदा पडद्यावर कधी पाहायला मिळणार याबद्दल प्रेक्षकांची उत्सुकता ताणली असली तरी त्यांना दिलासा देणारी एक गोष्ट घडली आहे.

नुकतेच सोनाक्षीच्या आगामी ‘वेलकम टू न्यूयॉर्क’ या चित्रपटातील एक गाणे प्रदर्शित झाले असून सलमान खान यात पाहुणा कलाकार आहे. यात सलमान आणि सोनाक्षीवर चित्रीत झालेले ‘नैन फिसल गए’ हे गीत प्रदर्शित झाले आहे. २३ फेब्रुवारी रोजी ‘वेलकम टू न्यूयॉर्क’ हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. यात सोनाक्षी गुजराती फॅशन डिझायनरच्या भूमिकेत झळकणार आहे.