धर्मा पाटलांच्या कुटुंबीयांना मिळणार ५४ लाखांचा मोबदला !


मुंबई : मंत्रालयात विषप्राशन केल्यानंतर उपचारादरम्यान रुग्णालयात मृत्युमुखी पडलेले शेतकरी धर्मा पाटील यांच्या कुटुंबीयांना ५४ लाख रुपयांचा मोबदला मिळणार असून जिल्हाधिकाऱ्यांनी ऊर्जा विभागाला धर्मा पाटील यांच्या जमिनीच्या फेरमूल्यांकनाचा अहवाल सादर केला आहे.

या अहवालात पाटील यांच्या पाच एकर जमिनीसाठी ५४ लाख रुपये मोबदला देण्याची शिफारस करण्यात आली असून यापूर्वीचा पंचनामा रद्द करुन रोपांच्या संख्येनुसार सानुग्रह अनुदान ग्राह्य धरण्यात येणार आहे. धर्मा पाटील यांच्या नावे २८ लाख ५ हजार ९८४ रुपये तर त्यांचे पुत्र नरेंद्र पाटील यांना २६ लाख ४२ हजार १४८ रुपयांचा मोबदला मनरेगा कायद्यातील तरतुदीप्रमाणे मान्य करण्यात आला आहे. वाढीव मोबदला इतर १२ प्रकल्पबाधित शेतकऱ्यांनाही मिळणार आहे.

Web Title: Dharma patil will get remuneration of 54 lakhs!