भाऊ-प्रियदर्शनच्या आगामी ‘सायकल’ चित्रपटाचा टीझर रिलीज


हृषिकेश जोशी, प्रियदर्शन जाधव आणि भालचंद्र कदम ही नावे मराठी रसिकांना काही नवीन नाही. प्रसिद्ध दिग्दर्शक प्रकाश कुंटे यांनी या विनोदी बादशहांना एकत्र आणत ‘सायकल’ या चित्रपटाचा प्रवास केला असून या चित्रपटाचा टीझर नुकताच प्रदर्शित झाला. लहान मुलगी हृषिकेषला सायकलची गोष्ट सांगण्याचा हट्ट या टीझरमध्ये करते. मग हृषिकेषचा सायकलची गोष्ट सांगण्याचा प्रवास सुरू होतो. भाऊ कदम, प्रियदर्शन जाधव हे प्रवासीही सायकलच्या या प्रवासात दिसतात.

प्रकाश कुंटे यांनी ‘कॉफी आणि बरंच काही’, ‘& जरा हटके’, ‘हंपी’ या चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे. त्यांच्या या दोन्ही चित्रपटांची प्रचंड चर्चा झाली. कॉफी आणि बरंच काही या चित्रपटाने तर बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली होती. ‘& जरा हटके’ या चित्रपटातून कुंटे यांनी एक प्रगल्भ प्रेमकथा मांडली होती. या चित्रपटांनंतर प्रकाश आता ‘सायकल’ हा चित्रपटा घेऊन येत आहेत. हा टीझर पाहता चित्रपटाही आश्वासक वाटत आहे.

व्हायकॉम१८ मोशन पिक्चर्स आणि द स्टुडिओ यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. स्वातंत्र्यापूर्वीच्या कालखंडातील सायकल या चित्रपटाची कथा आहे. आपल्याला कोकणातील एका छोट्या खेड्यातील कथा या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. केशव एका विशेष पात्राभोवती हलका फुलका असा हा चित्रपट फिरतो. केशवचे असून त्याचे त्याच्या सायकलवर अतिशय प्रेम आहे. चित्रपटाची कथा अदिती मोघे यांनी लिहिली आहे.

या चित्रपटाचे पोस्टर काही दिवसांपूर्वी प्रदर्शित करण्यात आले होते. प्रियदर्शन आणि भाऊ दोघेही पोस्टरमध्ये साधूंच्या कपड्यात दिसले होते. प्रेक्षकांना हे दोघे भोंदू बाबाची व्यक्तिरेखा साकारत आहेत का असा काहीसा प्रश्न पडला होता. पोस्टरमध्ये प्रियदर्शन, हृषिकेश, भाऊ हे तिथेही सायकलवर बसलेले आहेत. प्रियदर्शनने भाऊला डबल सीट घेतले आहे तर हृषिकेश मात्र विरुद्ध दिशेने बसलेला आहे.

Web Title: Bhau-Priyadarshan's upcoming 'cycle' movie teaser release