फक्त ४५ दिवसात बीसीसीआय कमावणार २ हजार कोटी रुपये


नवी दिल्ली – २००८ साली भारतीय क्रिकेट नियामंक मंडळाने सुरु केलेली इंडियन प्रीमियर लीग स्पर्धा म्हणजेच आयपीएल आज बीसीसीआयच्या उत्पन्नाचा मुख्य स्त्रोत बनली असून एकटया आयपीएलमधून बीसीसीआयच्या एकूण उत्पन्नापैकी तब्बल ९५ टक्के उत्पन्न मिळणार आहे. बीसीसीआयने जे अंदाजपत्रक आगामी आर्थिक वर्षातील उत्पन्न आणि खर्चाचे तयार केले आहे त्यानुसार बीसीसीआयला आयपीएलमधून २०१७ कोटी रुपयाचे अतिरिक्त उत्पन्न मिळणार आहे. त्याचबरोबर बीसीसीआयच्या तिजोरीत अन्य आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत क्रिकेट सामने, करार यातून १२५ कोटी जमा होणार आहेत.

जितका नफा वर्षाच्या ३२० दिवसांमध्ये खेळल्या जाणा-या सामन्यांमधून होतो आयपीएलच्या ४५ दिवसांमधून त्यापेक्षा १६ पट जास्त नफा फक्त मिळणार आहे. ३४१३ कोटींच्या उत्पनापैकी १२७२ कोटी रुपये क्रिकेटचे इन्फ्रास्ट्राक्चर आणि अन्य आवश्यक खर्च केल्यानंतर दोन हजार कोटींपेक्षा जास्त उत्पन्न शिल्लक राहणार आहे.

बीसीसीआयच्या चालू वर्षातील एकूण उत्पन्नात आयपीएलचा वाटा ६० टक्के म्हणजे ६७० कोटी रुपये असेल. जो स्टार इंडियाबरोबर पाचवर्षांचा १६३४७ कोटींचा प्रसारणाचा करार झाला आहे त्यामुळे पूर्ण चित्रच पालटणार आहे. बीसीसीआयला आयपीएलमधून २०१७ कोटी रुपये मिळणार आहेत.