सेना नेते आदित्य ठाकरेंचे काय चाललेय गुफ्तगू?


शिवसेना पक्षात मोठे पद मानल्या जाणाऱ्या नेतेपदी ठाकरे कुटुंबाच्या तिसऱ्या पिढीचे प्रतिनिधित्व करणारे आदित्य ठाकरे विराजमान झाले आहेतच पण त्यांचे काहीतरी गुफ्तगू सुरु असल्याचेही मीडियात चर्चिले जात आहे. आदित्य अंडी मिर्जीया चित्रपटाची हिरोईन सैयामी खेर या दोघांना बांद्रा येथील एका रेस्टोरंट मध्ये जात असताना मिडिया फोटोग्राफरने कॅमेऱ्यात कैद केले आहे. यावेळी आदित्य यांनी डोळ्यावर हात धरून फोटोग्राफर पासून बचाव करण्याचा प्रयत्न केला मात्र तो फारसा यशस्वी झाला नाही.

या दोघांमधील रिलेशन बद्दल अनेकदा चर्चा सुरु असते. सैयामी जुन्या काळातील नामवंत अभिनेत्री उषा किरण याची नात आहे व या दोन कुटुंबात दीर्घकाळ घरोबा आहे असे समजते. राकेश ओम प्रकाश याच्या मिर्झिया चित्रपटातून सैयामीने हर्षवर्धन कपूर याच्यासोबत बॉलीवूड डेब्यू केला होता. त्यानंतर ती मराठी व हिंदी चित्रपटात दिसली होती.

आदित्य यांचा जन्म १३ जून १९९० सालचा आहे. मुंबईत नाईट लाइफ सुरु करण्याची मागणी त्यांनी केली होती. तसेच त्यांना कविता आणि गाणी लिहिण्याचा छंद असून त्यांचा कविता संग्रह आणि गाण्याचा अल्बम प्रसिद्ध झाला आहे. स्टाईल आयकॉन म्हणूनही त्यांची ओळख आहे. मॉडेलसारखे फोटो शूट करून त्यांनी ते ट्विटरवर शेअर केले आहेत. बॉलीवूड मध्ये त्यांचे अनेक मित्र आहेत मात्र त्यात सैयामी खास आहे असेही समजते.