रिओ कार्निवलची शंभरी


ब्राझीलची राजधानी रिओ द जनेरो येथे दरवर्षी होणाऱ्या कार्निवल समारंभाची यंदा शंभरी साजरी केली जात असून पाच दिवस हा उत्सव चालणार आहे. रविवारी सुरु झालेल्या या उत्सवात ब्लॅकॉ स्ट्रीट वर शंभरावी परेड झाली. यावेळी ४५० बँड होते व हजारो लोकांनी नृत्य करत हि अनोखी परेड सुंदर बनविली. यावेळी ४ लाख परदेशी पर्यटक आले होते. पाच दिवसात येथे किमान १५ लाख परदेशी पर्यटक हजेरी लावतील असा अंदाज वक्त केला जात आहे.

या परेडची सुरवात सांबा परेडने झाली. ब्राझील नागरिक, पोर्तुगाल आणि स्थानिक आफ्रिकी संस्कृतीचे पारंपारिक प्रदर्शन या परेडमध्ये घडते. ईश्वराकडून वरदान म्हणून मिळालेल्या पाण्याबद्दल आभार मानण्यासाठी हा सोहळा केला जातो. पाच दिवसांच्या या समारंभात किमान १ कोटी लोक सहभागी होतात. सांबाड्रोम स्टेडीयम मध्ये ८० हजार प्रेक्षक हजर होते. यंदा परेड मधील ग्रुपनी जेन्डर समानता आणि लैगिक शोषण विरोधी आवाज उठविला आहे.

या उत्सवामुळे देशाच्या आर्थिक उत्पन्नात मोठी भर पडते. यंदा या उत्सवामुळे ७२ हजार कोटी रुपयांची उत्पन्न देशाला मिळेल असे सांगितले जात आहे.

Leave a Comment