ओप्पोचा ए ७१ स्मार्टफोन भारतात उपलब्ध


आर्टीफिशियल इंटेलीजन्स ब्युटी तंत्रज्ञानाने युक्त चीनी मोबाईल कंपनीने त्यांचा ओप्पो ए ७१ स्मार्टफोन भारतीय बाजारात उपलब्ध केला आहे. या फोनची किंमत ९९९० रु. असून त्यात विशेष एआय ब्युटी फंक्शन दिले गेले आहे. हा फोन २०० पेक्षा अधिक फेशियल फीचर्स साठवितो. यामुळे फोन अनलॉक करताना चेहऱ्याची ओळख अधिक अचूक केली जाते.

ओप्पो इंडियाचे विल यांग यांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांचा ए सिरीजमधला हा नवा फोन आहे. या फोनला ५ एमपीचा फ्रंट कॅमेरा, १३ एमपीचा रिअर कॅमेरा दिला गेला असून कमी प्रकाशातही चांगले फोटो काढले जातात. फोनसाठी ५.२ इंची डिस्प्ले, अँड्राईड ७.१ ओएस, ३ जीबी रॅम, १६ जीबी इंटर्नल मेमरी व फास्ट चार्जिंग सुविधा असलेली ३ हजार एमएएच ची बॅटरी दिली गेली आहे.

Leave a Comment