सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओतील ‘ही’ अभिनेत्री कोण?


सोशल मीडियावर गेल्या २ दिवसांपासून एका मुलीचा फोटो आणि तिचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ती मुलगी या व्हिडिओमध्ये अगदी स्टाईलने तिच्याकडे पाहणाऱ्या मुलाला डोळा मारते. सोशल मीडियावर सगळ्यांनाच या दोघांच्या व्हिडिओने वेड लावले आहे. पण ही ऐवढी सुंदर मुलगी आहे तरी कोण? असा प्रश्न सगळ्यांनाच पडला आहे. तर तिचे नाव प्रिया प्रकाश वारियर असे असून ती दक्षिणात्य अभिनेत्री आहे.

मल्ल्याळम चित्रपट ‘ओरु अदार लव्ह’मधील सोशल मीडियावर व्हायरल होणार हे गाणे आहे. ‘मनिक्या मलराया पूवी’ असे या गाण्याचे बोल आहेत. हे गाणे सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे.

प्रियाच्या काही क्यूट एक्सप्रेशन्सची चर्चा थांबता थांबत नाही आहे. तिच्या डोळ्यांच्या खूणा आणि त्यावर घायाळ होणारे अनेक जण सोशल मीडियावर गाण्याचे फारच कौतुक करत आहेत. या गाण्याने बघता बघता ४५ लाखांच्यावर व्ह्युज मिळवले आहेत.