मुंबई : तुम्ही इन्स्टाग्रामवर दुसऱ्याच्या स्टोरी नकळत बघत आहात ? स्टोरीचा स्क्रीनशॉट काढत आहात ? पण हे जर लपूनछपून करत असाल तर जरा थांबा. कारण आता यूजर्सला हा रेकॉर्ड कळू शकणार आहे. इन्स्टाग्राम आता स्क्रीनशॉट घेणाऱ्याचे नावही सांगणार आहे.
आता इंस्टाग्राम देणार तुमच्या खात्याची टेहळणी करणाऱ्याची माहिती ?
इन्स्टाग्राम यासाठी एक नवे फिचर घेऊन येत आहे, युजर्सना जे नोटीफिकेशन देणार आहे. हे फिचर यायला अजून वेळ असून त्याच्या डेव्हलपिंगचे काम सुरू आहे. याबाबत ‘द इंडिपेंडेंट’ ने दिलेल्या वृत्तानुसार जर कोणी तुमच्या इन्स्टाग्राम स्टोरीचे स्क्रीनशॉट घेत असेल तर ‘सुर्या’च्या सिंम्बॉलसहीत स्टोरी व्ह्यू सेक्शनमध्ये दिसणार आहे.