घरच्या घरी तयार करा टूथपेस्ट…


सकाळी उठल्यानंतर आणि रात्री झोपण्यापूर्वी दात ब्रश करण्याची सवय आपल्याला लहानपणापासूनच शिकविली जाते. तसेच काहीही खाल्ल्या-प्यायल्यानंतर स्वच्छ चुळा भरण्याची शिकवण दिली जाते. इतके सगळे करूनही दातांच्या निरनिराळ्या समस्या उद्भविताना दिसतात. दात किडणे, हिरड्या सुजणे किंवा त्यांतून रक्त येणे, श्वासाची किंवा तोंडाची दुर्गंधी, दात पिवळे पडणे अश्या अनेक तक्रारी उद्भविताना दिसतात.

अनेक वेळा काही थंड किंवा गरम पदार्थ खाल्ल्यानंतर दातांमध्ये कळा येतात. ह्यालाच ‘टूथ सेन्सिटीव्हिटी’ असे म्हटले जाते. वाढत्या वयासोबत आपले दात कमकुवत न होता चांगले बळकट आणि रोगमुक्त राहावेत या साठी आपण निरनिरळ्या टूथपेस्ट्स चा वापरही करीत असतो. पण या वेगवेगळ्या टूथ पेस्ट वापरूनही दातांशी निगडीत समस्या कमी होतातच असे नाही.

अश्या वेळी दातांच्या समस्या दूर करणारी टूथपेस्ट घरच्या घरी बनविता येऊ शकते. या टूथपेस्ट च्या वापराने दात बळकट, शुभ्र होतील आणि दात किडणे, हिरड्या सुजणे किंवा त्यातून रक्त येणे, तोंडाला आणि श्वासाला दुर्गंधी येणे या तक्रारी देखील दूर होतील. ही पेस्ट बनविण्याकरिता अर्धा कप नारळाचे तेल, तीन चमचे बेकिंग सोडा, दोन लहान पॅकेट्स स्टीव्हिया पावडर ( ही पावडर साखरेऐवजी वापरायची आहे ), आणि वीस थेंब दालचिनी किंवा पुदिन्याचे तेल या साहित्याची आवश्यकता आहे. नारळाचे तेल कोमट करून घेऊन मग त्यामध्ये हे बाकीचे साहित्य मिसळावे. त्यानंतर हे मिश्रण थंड होऊ द्यावे आणि थंड झाल्यानंतर हे मिश्रण एका स्वच्छ काचेच्या बरणीमध्ये भरून ठेवावे. जेव्हा दात ब्रश करायचे असतील, तेव्हा ही घरगुती पेस्ट ब्रशवर लावून घेऊन नेहमीप्रमाणे दात ब्रश करावेत.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment