‘डेटिंग’ ची डिक्शनरी…


आताच्या काळामध्ये डेटिंगची कल्पना आपल्या चांगली परिचयाची झाली आहे. आजची तरुण पिढी डेटिंग द्वारे एकमेकांना भेटते, एकमेकांविषयी अधिक जाणून घेण्याचा प्रयत्न करते. केवळ मैत्रीपेक्षा काही अधिक आणि प्रेमापेक्षा काही कमी असे काहीसे नातेसंबंध असणाऱ्या मंडळींच्या गाठी भेटी डेटिंग द्वारे होत असतात. या डेटिंगच्या पद्धतीची देखील स्वतःची अशी एक वेगळीच भाषा आहे. या डेटिंगच्या जगतातील काही संकल्पनांची ओळख करून घेऊ या.

जर एकमेकांना ‘डेट’ करीत असणाऱ्या जोडप्यापैकी एकाने अचानक संपर्क ओडून टाकला, तर त्याला डेटिंग जगतामध्ये ‘घोस्टिंग’ असे म्हणतात. संपर्कामध्ये न राहिलेल्या व्यक्तीचे मेसेज, फोन, ट्वीट, फोटो सगळे काही अचानक बंद होते. दुसऱ्या व्यक्तीच्या मेसेजेस्, फोन्स द्वारे ही संपर्कात न राहू इच्छिणारी व्यक्ती कसलेच प्रत्युत्तर देईनाशी होते. यालाच घोस्टिंग असे म्हणतात. बहुतेक लोक आपल्या ‘डेट’शी संपर्क न ठेवण्यासाठी याच पद्धतीचा अवलंब करताना दिसतात. तर काही वेळी काही व्यक्ती तुमच्या आयुष्यामध्ये अचानक प्रकट होतात. हळूहळू त्यांचा सहवास तुम्हाला आवडू लागतो. आणि मग त्या व्यक्ती जशा अचानक आल्या, तश्याच त्या अचानक गायब होऊन जातात. काही काळ त्या व्यक्ती तुमच्या अजिबात संपर्कात रहात नाहीत. त्यानंतर काही काळाने त्या पुन्हा तुमच्या आयुष्यामध्ये प्रकट होतात. हा सर्व प्रकार गोंधळवून टाकणारा असतो, यालाच डेटिंगच्या भाषेमध्ये ‘ ब्रेड क्रम्बिंग ‘ असे म्हणतात.

डेटिंगच्या दुनियेतील आणखी एक शब्द आहे, ‘ कॅट फिशिंग ‘ . ऑनलाईन ‘डेट’ शोधणाऱ्या व्यक्तींच्या बाबतीत हा प्रकार हटकून घडतो. अनेकदा ऑनलाईन चॅटिंग करीत असताना अनेक व्यक्ती आपली खरी ओळख देत नाहीत. काही काळ चॅट केल्यानंतर जेव्हा समोरची व्यक्ती प्रत्यक्ष भेटण्याची इच्छा व्यक्त करते, आणि जेव्हा प्रत्यक्ष भेट होते, तेव्हा आपण ‘डेट’ करीत असलेली व्यक्ती प्रत्यक्षात कोणी तरी दुसरीच असल्याचे लक्षात येते. याच प्रकाराला कॅट फिशिंग असे म्हणतात. हा प्रकार ऑनलाईन डेटिंगच्या बाबतीत सर्रास पाहायला मिळतो.

एकाच वेळी दोन वेगवेगळ्या व्यक्तींना डेट करण्याच्या प्रकाराला ‘कुशनिंग’ असे म्हटले जाते. एका व्यक्तीशी नातेसंबंध बिघडले, तर दुसऱ्या व्यक्तीचा ‘ बॅक अप ‘ ठेवण्याचा हा प्रकार आहे. कुशनिंग करणाऱ्या व्यक्ती एकाच वेळी दोन्ही व्यक्तींच्या संपर्कात राहतात, आणि एका व्यक्तीशी असलेले नातेसंबंध संपुष्टात आल्यानंतर दुसऱ्या व्यक्तीमध्ये खऱ्या अर्थाने रस घेऊ लागतात. प्रेमाचा सतत वर्षाव करणाऱ्या ‘डेट’ ला ‘लव्ह बॉम्बिंग’ म्हटले जाते. यामध्ये डेटिंग करणारी व्यक्ती आपल्या जोडीदाराला सतत फोन, त्याच्या भावना व्यक्त करणारे मेसेजेस, ट्वीट पाठवत असते. त्या व्यक्तीचे लक्ष पूर्णपणे आपल्या जोडीदारावरच केंद्रित असते. ही व्यक्ती आपल्या जोडीदाराचा विश्वास जिंकण्याचा सतत प्रयत्न करीत असते. अश्या डेट्स बहुतेक वेळी सफल ठरतात.

Leave a Comment