प्रवाशांचा जीव वाचविणाऱ्या महिला वैमानिकाला एअर इंडियाचा


नवी दिल्ली – एअर इंडिया आणि विस्तारा एअर लाईन्सच्या विमानांचा गेल्या आठवड्यात हवेत अपघात होता-होता वाचला. एअर इंडियाने या अपघातापासून एअर इंडियाच्या प्रवाशांनी भरलेल्या विमानाला वाचवणाऱ्या वैमानिक अनुपमा कोहली यांना सलाम केला आहे. अनुपमा कोहली यांचा फोटो एअर इंडियाने ट्विटवर ट्विट करत त्यांचे आभार मानले आहेत.


विस्तारा एअर लाईन्सचे विमान दिल्लीवरुन पुण्याला निघाले होते आणि एअर इंडियाचे भोपाळला निघालेले विमान यांच्यामध्ये ७ फेब्रुवारीला होणारा अपघात वैमानिक अनुपमा कोहली यांच्या सतर्कतेमुळे टळला. ही दोन विमाने यावेळी एकमेकांपासून फक्त १०० मिटर अंतरावर होती. विस्तारा एअर लाईन्सचे विमान जवळ आल्याचे लक्षात येताच कोहली यांनी तत्परता दाखवत सुरक्षित एअर इंडियाचे विमान दूर नेले. त्यांच्या याच तत्परतेमुळे एअर इंडियाने अनुपमा कोहली यांचे आभार मानले आहेत.