बर्फात धावणारी निस्सानची ३७० झेड के आय कार


जपानची प्रसिद्ध ऑटो कंपनी निस्सानने शिकागो येथे १० ते १९ फेब्रुवारी दरम्यान होत असलेल्या ऑटो शो मध्ये जगातील पहिली बर्फात धावणारी कार पेश केली आहे. कंपनीतील हुशार अभियंत्यांनी टॉप रँक ३७० झेड रोडस्टर या कारमध्ये त्यासाठी काही महात्वाचे बदल केले आहेत. पहाडी भागात बर्फातून चालणाऱ्या या कारचे नामकरण ३७० झेडकेआय असे केले गेले आहे. या कारला टायर नाहीत.

कारच्या पुढच्या भागात स्कीज लावले गेले आहेत तर मागच्या चाकांच्या जागी स्नो ट्रॅक आहेत. या कारच्या चाचण्या यशस्वी झाल्या आहेत. रोडवर ० ते १०० किमीचा वेग ५.५ सेकंदात घेणाऱ्या रोडस्टरच्या तुलनेत हि कार बर्फावर २५० चा वेग घेते.

निस्सानचे नॉर्थ अमेरिकेतील प्रोडक्ट प्लॅनिंग विभागाचे उपाध्यक्ष मायकल बुंस म्हणाले या कारला ३.७ लिटरचे व्ही सिक्स इंजिन सेव्हन स्पीड ऑटोट्रान्समिशन सह दिले गेले आहे. ब्रेक मूळ कारप्रमाणे असले तरी ब्रेक लाईनमध्ये काही बदल केले गेले आहेत. ग्राउंड क्लिअरन्स तीन इंचांनी वाढविला गेला आहे. हेडलाईट टीन्टेड यलो ग्लासचे आहेत यामुळे चालकाला पुढील रस्ता पाहताना अडचण येणार नाही. मार्केट मध्ये हि कार लगेच आणली जाणार नाही. मागणी पाहून त्याप्रमाणे तिचे उत्पादन वाढविले जाणार आहे.

Leave a Comment