जगभरात पेमेंटसाठी उपयुक्त स्मार्ट रिंग


डेबिट क्रेडीट कार्ड बरोबर बाळगायचे झंझट दूर करणारी त्याचबरोबर खऱ्या सोने हिऱ्याच्या अंगठ्यांचा खर्च वाचवून आपल्या प्रिय व्यक्तीला सहज गिफ्ट देता येणारी स्मार्ट अंगठी बाजारात दाखल झाली असून सध्या ती फक्त ऑस्ट्रेलियात उपलब्ध आहे. या स्मार्ट रिंगच्या सहाय्याने जगभरात कुठेही पेमेंट करणे श्यक्य आहे. ऑस्ट्रेलियात अनेक लोक या स्मार्ट रिंगचा वापर करत आहेत.

ही स्मार्ट रिंग कॉन्टॅक्टलेस पेमेंट सिस्टीमचा एक भाग आहे. पेमेंट कौंटरवर डेबिट कार्ड ऐवजी या अंगठीने मशीनला टच केला की काही सेकंदात पेमेंट होऊ शकते. ती चोवीस तास वापरता येते कारण रिंग वॉटरप्रुफ आहे. तिला वारंवार चार्ज करण्याची गरज पडत नाही. गो स्मार्ट रिंग या नावाने मास्टर कार्डने ती बाजारात आणली आहे. ती वापरायला सोपी आहेच पण सुरक्षितही आहे. त्यातील फ्रॉड प्रोटेक्शन सिस्टीम उच्च दर्जाची आहे. या रिंगचा दुरुपयोग करणे सोपे नाही. ती हरवली तर बँकेला फोन करून कॅन्सल करता येथे व त्याजागी दुसरी रिंग सहज घेता येते.

ऑस्ट्रेलियात सध्या ती उपलब्ध असून तिची किंमत आहे ४० डॉलर्स. म्हणजे साधारण २५०० रु. भारतात ही स्मार्टरिंग एक दोन वर्षात येईल असे सांगितले जात आहे.

Leave a Comment