कॅश बरोबर अनेक कामी उपयुक्त स्मार्ट एटीएम लवकरच


भारतात एटीएम वापरत लवकरच क्रांती होत असून आता स्मार्ट एटीएम वापरत आणली जात आहेत. केवळ रोकड काढणे या कामाव्यतिरिक्त डिजिटल मशीनने ही नवी एटीएम बदलली जात आहेत. नवी मशीन आकाराला छोटी आहेतच पण त्याच्या किमतीही जुन्या मशीनपेक्षा निम्म्याने कमी आहेत. जुन्या एटीएम च्या किंमती ६ लाख पर्यंत आहेत तर नवी ३ लाखातच मिळणार आहेत.

या नव्या मशीन मध्ये १५ इंची टॅबलेट प्रमाणे दिसणारा मल्टीटच स्क्रीन आहे. या मशीनला आधार बेस्ड बायोमेट्रीक अॉथेंटीकेशन सुविधा आहे. या मशिनच्या सहाय्याने नेट बँकिंग करता येईल. काँटॅक्टलेस कार्ड सुविधा दिली गेली असून यात स्मार्टफोन चा वापर डेबिट कार्ड स्वरुपात करता येईल. या मशिनन सुरक्षा फीचर्स चांगल्या दर्जाची आहेत.

मशीननिर्माती कंपनी एनसीआरचे व्यवस्थापकीय संचालक नवरोज दस्तूर या संदर्भात माहिती देताना म्हणाले, आम्ही नवी एटीएम सेल्फ सर्व्ह सिरीज नावाने तयार केली आहेत. त्यामुळे एटीएमला बँक एक्स्टेंशन चे स्वरूप मिळाले आहे. देशात सध्या जेवढी एटीएम आहेत त्यातील निम्मी आमच्या कंपनीची आहेत. मेक इन इंडिया प्रकल्पाखाली नवी एटीएम तयार करण्यात आली असल्याने त्यांच्या किमती कमी ठेवणे शक्य झाले आहे. चेन्नई येथे या मशीनचे उत्पादन केले जात आहे.

Leave a Comment