डायजेस्टीव्ह बिस्किटे चेपताय, मग हे वाचा


वजन कमी करण्याचे फॅड सध्या इतके बोकाळले आहे कि वजन कमी करणारी कोणतीही वस्तू लोक आंधळेपणाने खरेदी करतात असे दिसून येत आहे. वजन कमी करायचे म्हणजे आहारावर कंट्रोल आलाच. मग अशक्तपणा जाणवू न देता वजन कमी करणारे पदार्थ लोकप्रिय झाले तर त्यात नवल काय? पण आपण खातो ते असले पदार्थ खरोखरच उपयुक्त आहेत का याचा सारासार विचार केला जात नाही.

बाजारात अनेक कंपन्यांनी आणलेली डायजेस्टीव्ह बिस्किटे याच श्रेणीत मोडतात. फायबर भरपूर असल्याची जाहिरात होणारी ही बिस्किटे वजन नियंत्रणासाठी उपयुक्त असल्याचे भासविले जात असले तरी प्रत्यक्षात ही बिस्किटे वजन वाढवितात याची माहिती अनेकांना नाही.

वास्तविक ज्यांना बद्धकोष्ठता आहे त्यांच्यासाठी डॉक्टर लोकांनी या बिस्किटांची शिफारस केली मात्र त्याची जाहिरात हेल्दी म्हणून केली जाते. चहाबरोबर खाल्ली जाणारी ही बिस्किटे आरोग्यपूर्ण नाहीत. कारण त्यात मैदा, सोडियम आणि साखरचे तसेच फॅट चे प्रमाण भरपूर आहे. एका बिस्कीटातून ५० कॅलारी मिळतात. शिवज ती अधिक टिकावी म्हणून प्रोसेस केली जातात. यात प्रोटीन, फायबर, मिनरल असल्याची जाहिरात केली जाते मात्र हे घटक चव वाढविण्यापुरतेच आहेत असे दिसून आले आहे. परिणामी ती हेल्दी नसून उलट वजन वाढविणारी आहेत असे समजते.

Leave a Comment