रेल्वे प्रवासात मिळणार चित्रपट आणि वाय-फायची मेजवानी


मैसूर ते चेन्नई या दरम्यान शताब्दी एक्स्प्रेसने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना आता चित्रपटांची आणि वाय-फायची मेजवानी मिळणार आहे. दक्षिण रेल्वेने या एक्सप्रेसमध्ये तब्बल 100 हून अधिक चित्रपट आणि मोफत वायफाय उपलब्ध करून दिले आहेत. चेन्नई ते म्हैसूर हा प्रवास सात तासांचा आहे.

संपूर्ण देशभरात धावणाऱ्या शताब्दी एक्स्प्रेसच्या प्रवाशांना अधिक चांगला अनुभव देण्यासाठी रेल्वे मंत्रालयाने रेल्वे मंत्रालयाने प्रोजेक्ट स्वर्ण हा प्रकल्प सुरू केला आहे. चेन्नई-म्हैसूरु मार्गावरील प्रवाशांना देण्यात येणाऱ्या सुविधा हा या प्रकल्पाचा एक भाग आहे.

दक्षिण रेल्वेने दिल्लीतील मॅजिक बॉक्स नावाच्या कंपनीची यासंबंधात करार केला असून लॅपटॉप आणि मोबाइल व प्रवासी आपल्या वाय-फायद्वारे कनेक्ट करून 100 पेक्षा जास्त चित्रपट पाहू शकतील. मात्र प्रवाशांना या प्रवासात इंटरनेट पाहता येणार नाही. या गाडीतील डब्यांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे सुध्दा बसविण्यात आले आहेत.

दक्षिण रेल्वेने या संदर्भात एक निवेदन प्रसिद्ध केले असून त्यात म्हटले आहे, की एका डब्याचे सुधारणा करण्यासाठी सरासरी दहा लाख रुपये खर्च येतो. मात्र हे अपग्रेडेशन करत असतानाही रेल्वेने तिकिटांची कोणतीही भाडेवाढ केलेली नाही हे विशेष.

Leave a Comment