ब्रेन अन्युरीझम म्हणजे नेमके काय?


ब्रेन अन्यूरीझम्स मुळे अचानक सुरु झालेली असह्य डोकेदुखी जर वेळीच लक्षात अली नाही, तर त्यामुळे जीवावर बेतण्याची शक्यता असते. असे हे जीवघेणे असू शकणारे ब्रेन अन्युरीझम म्हणजे नक्की काय? ब्लड व्हेसल वॉल्स मधील एखाद्या कमकुवत स्पॉटमुळे ब्लड व्हेसल्स मध्ये सूज येते. अन्युरीझम्स बहुतेकवेळी एओर्टा मध्ये उत्पन्न होतात, पण मेंदूमध्ये देखील अन्युरीझम्स उत्पन्न होऊ शकतात.

ब्रेन अन्युरीझममुळे उत्पन्न होणारी डोकेदुखी आणि एरव्ही इतर कारणांमुळे उत्पन्न होणारी डोकेदुखी यामध्ये फरक कळून येणे खूप कठीण असते. मायग्रेन मुळे उद्भवणारी डोकेदुखी देखील तितकीच असह्य असू शकते. जर ब्रेन अन्युरीझम ‘रप्चर’ झाले, तर त्यामुळे त्वरित भयंकर, असह्य डोकेदुखी उद्भविते. मायग्रेन आणि ब्रेन अन्युरीझममुळे उद्भविणारी डोकेदुखी, आणि त्यातील फरक लक्षात न आल्याने ब्रेन अन्युरीझम कडे दुर्लक्ष केले जाण्याची शक्यता जास्त असते.

ब्रेन अन्युरीझम ओळखण्याच्या काही खुणा आपल्याला माहित असणे अगत्याचे आहे. ब्रेन अन्युरीझम मध्ये उद्भविणारी डोकेदुखी अचानक, कोणतीही लक्षणे दिसून न येता सुरु होते. ही डोकेदुखी अतिशय असह्य स्वरूपाची असते. ब्रेन अन्युरीझम असलेल्या रुग्णाला डोळ्यांवर थोडा ही प्रकाश सहन होईनासा होतो. डोळ्यांवर आलेल्या हलक्या प्रकाशाने देखील डोकेदुखी आणखी बळावते. क्वचित प्रसंगी ‘ seizures ‘ , म्हणजे फिट्स येऊ शकतात. रुग्णाला सतत मळमळणे, किंवा उलटी येत असल्याची भावना होते. डोळ्यांसमोर अंधारी येऊ लागते, आणि काहीही दिसायला त्रास होतो.

ब्रेन अन्युरीझम असलेल्या रुग्णाच्या डोळ्यांवरील पापण्या बंद झाल्यासारख्या दिसू लागतात. पापण्या पूर्णपणे उघडणे अशक्य होऊ लागते. अचानक झटक्याने मान अवघडणे, किंवा चेहऱ्यावर कोणत्याही प्रकारची संवेदना न जाणाविणे, एकाच डोळ्याच्या मागे काही तरी टोचल्यासारखी वेदना होणे, शुद्ध हरपणे, स्फोट झाल्याप्रमाणे आवाज ऐकू येणे ही ब्रेन अन्युरीझमची आणखी काही लक्षणे आहेत.

या लक्षणांपैकी कोणती ही लक्षणे जर दिसून आली, तर त्वरित वैद्यकीय सल्ला घेण्याची आवश्यकता आहे. डोकेदुखी निरनिराळ्या कारणांनी उद्भवत असते. आणि दर वेळी डोकेदुखीचे एकच कारण असू शकत नाही. त्यामुळे जर डोकेदुखी असह्य झाली आणि त्याबरोबर काही इतर लक्षणे दिसू लागली, तर त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment