लहान मुलांसाठी हँड सॅनिटायझर कितपत आवश्यक?


बदलत्या काळानुसार हँड सॅनिटायझर वापरण्याची गरज वाढत आहे. महिला आपल्या लहान मुलांचे हात किटाणूरहित करण्यासाठी सॅनिटायझरचा मोठ्या प्रमाणावर वापर करीत आहेत. सॅनिटायझर वापरणे अतिशय सुविधाजनक आणि वेळेची बचत करणारे ठरते आहे. शिवाय यासाठी पाण्याची आवश्यकता देखील नाही. त्यामुळे घराबाहेर असताना हात स्वच्छ करण्याची वेळ आली, तर सॅनिटायझर वापरणे सोयीचे होऊ लागले आहे. पण याचा वापर करताना यापासून होऊ शकणाऱ्या दुष्परिणामांचा देखील विचार करायला हवा. ह्याचा वारंवार वापर लहान मुलांकरिता धोकादायक ठरू शकतो.

अमेरिकेतील सेटर फॉर डिसीज कंट्रोल ( सीडीएस ) ने केलेल्या अभ्यासानुसार हँड सॅनिटायझर सतत वापरणाऱ्या लहान मुलांवर त्याचे दुष्परिणाम दिसू लागल्याचे म्हटले आहे. बारा वर्षांपर्यंतच्या वयोगटातील मुलांचे अवलोकन करून हा निष्कर्ष काढण्यात आला आहे. सॅनिटायझर मध्ये ट्रायकलोसॅन नामक एक रसायन असते, ज्यामुळे लहान मुलांच्या नाजूक त्वचेला नुकसान होऊ शकते. जास्त काळ, आणि वारंवार सॅनिटायझर वापरल्याने त्वच कोरडी पडू लागते, आणि शरीरावर त्याचे इतरही परिणाम दिसून येतात. क्वचित केसेस मध्ये प्रौढ व्यक्तींच्या बाबतीत हृदयरोगाशी आणि स्त्रियांच्या बाबतीत गर्भधारणा न होऊ शकण्याशी देखील सॅनिटायझरच्या अतिवापराचा संबंध जोडला गेला आहे. त्यामुळे मुलांसाठी सॅनिटायझर जेव्हा अगदी आवश्यकता असेल, आणि हात साफ करण्याचा इतर कोणताही पर्याय उपलब्ध नसेल तेव्हाच वापरावा. अन्यथा साबण आणि पाणी वापरून हात धुण्याची पद्धत, थोडासा वेळ घेणारी असली, तरी सर्वात सोपी आणि सुरक्षित आहे.

अमेरीकेतील सीडीएस ने केलेल्या अभ्यासानुसार हँड सॅनिटायझर वारंवार वापरल्यास लहान मुलांच्या शरीरातील रोगप्रतिकारशक्ती कमी होऊ शकते. यामुळे मुले सतत आजारी पडण्याचा धोका निर्माण होऊ शकतो. याच्या अतिवापराने मुलांच्या लघवीच्या सँपल्स मध्ये इंफ्लेमेटरी तत्वे सापडली असून, रोगप्रतिकारशक्ती कमी करणारी रीअॅक्टीव्ह प्रोटीन्स सापडली आहेत. सॅनिटायझरचा अतिवापर प्रौढांकरिता देखील तितकाच धोकादायक ठरू शकतो.

Leave a Comment