ब्लेडच्या मध्यभागी का तयार केले गेले एक विशिष्ट डिझाइन ?


आपल्यातील अनेकजण बोलण्यापेक्षा सर्वचजण दाढी करण्यापासून ते केस कापण्यापर्यंत ब्लेडचा वापर करतात. पण तुम्ही कधी विचार केला आहे का ब्लेडच्या मध्यभागी एक विशिष्ट डिझाइन का तयार केले गेले? आजमितीस ब्लेडची निर्मिती करणा-या अनेक कंपन्या आहेत, पण त्या सर्व कंपन्या एकाच डिझाइनचा वापर का करतात? पण आम्ही तुम्हाला आज या प्रश्नाची उत्तरे देणार आहोत. ब्लेडच्या मध्यभागी असलेल्या या खास डिझाइनमागे जिलेट कंपनी आहे. ब्लेड निर्मितीची याच कंपनीने सुरुवात केली होती.

१९०१ साली जिलेट कंपनीचे संस्थापक किंग कँप जिलेट यांनी त्यांचे सहकारी विलियम निकर्सन यांच्यासोबत मिळून ब्लेड डिझाइन तयार केले होती. त्यावेळी तयार झालेले डिझाइन एवढ्या वर्षांत कधीही बदलण्यात आलेले नाही. किंग कँप जिलेट यांनी तयार केलेल्या डिझाइनचे पेटेंट करुन घेतले आणि याच्या उत्पादनाला १९०४ साली सुरुवात केली. तेव्हापासून आज पर्यंत ब्लेडची एकच डिझाईन बाजारात उपलब्ध आहे. नंतर आलेल्या सर्व कंपन्या याच डिझाईनलाच फॉलो करत आल्या आहेत. त्यामध्ये टोपाज आणि मारफक या प्रसिद्ध कंपन्यांचा ही समावेश आहे.

ब्लेडच्या मध्यभागी जी डिझाइन असते ती का असते याचा आपण कधी हा विचार केला आहे? जिलेटने जेव्हा पहिल्यांदा ब्लेडची निर्मिती केली होती, तेव्हा त्यांनी ब्लेडचे १६५ डिझाइन तयार केले होते. ब्लेडच्या मध्यभागी जे डिझाइन करण्यात आले होते, त्यामागे शेव्हिंग करते वेळी ब्लेड सोप्या पद्धतीने बोल्टमध्ये सेट करता यावा हा हेतू होता. ब्लेडच्या मध्यभागी विशिष्ट जागा याच कारणामुळे सोडली जाते, जेणेकरून शेविंग करते वेळेस शेविंग हँडमध्ये अगदी आरामात फिट होईल. ब्लू जिलेट नावाने १९०४ मध्ये जिलेट यांनी ब्लेडचे उत्पादन केले होते.

जिलेट कंपनीचे संस्थापक किंग कँप जिलेट १८९०साली बाटलीचे झाकण बनवण्याच्या कंपनीत सेल्समन होते. त्यांनी नोकरी करत असताना बघितले, की लोक वापरात आणलेल्या बाटल्यांचे झाकण फेकून देतात. पण तरीसुद्धा एवढ्या छोट्याशा वस्तूमुळे मोठी कंपनी सुरु आहे. अशीच एक लहानगी वस्तू बनवण्याचा विचार त्यांनीही केला. लोकांनी वापर केल्यानंतर त्यांना ती फेकुन देता यावी, अशी वस्तू तयार करण्याचा जिलेट यांनी निर्णय घेतला. लोक शेव्हिंगसाठी त्याकाळात चाकुचा वापर करत असत. या वस्तूला पर्यायी वस्तू शोधण्याचा निर्णय किंग कँप जिलेट यांनी घेतला. त्यांनी दोन्ही बाजुनी धार असलेली सेफ्टी रेजर बनवली. डिसेंबर १९०१मध्ये त्यांनी डिझाइनला पेटेंट केले.

Leave a Comment