या बलाढ्य देशाच्या राष्ट्राध्यक्षाकडे नाही स्मार्टफोन


सध्या जमान्यात स्मार्टफोनशिवाय अनेकांचा दिवसच जाऊ शकत नाही हे उघड आहे. आज जगात स्मार्टफोनचा वापर करणारे कोट्यवधी लोक आहेत. पण आपण स्मार्टफोन वापरत नसल्याचे रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन ठामपणे जगाला सांगत आहे. त्यांना स्मार्टफोनवरून नुकताच प्रश्न विचारण्यात आला. त्यांनी यावर जे उत्तर दिले त्यामुळे अनेकांना आश्चर्याचा धक्काच बसला. ते म्हणाले. आजच्या घडीला भलेही जग स्मार्टफोन वापरत असेल पण मी स्मार्टफोन वापरतच नाही.

तंत्रज्ञानाच्या बाबतीत आपण फारसे सरसावलो नसल्याची कबुली ही त्यांनी यावेळी दिली. आपल्याजवळ २००५ पर्यंत मोबाईल फोन नसल्याचेही पुतिन म्हणाले. पुतिन यांनी गेल्यावर्षी शालेय विद्यार्थ्यांशी भेट घेतली होती. आपण त्यावेळी कमीत कमी इंटरनेटचा वापर करत असल्याचेही त्यांनी सांगितले. तुम्ही इन्स्टाग्रामवर सक्रीय असता का? असा प्रश्न काही विद्यार्थ्यांनी त्यांना विचारला होता त्यावेळी दिवसभर मी काम करतो त्यामुळे मला या सर्व गोष्टींसाठी वेळ नसल्याचे त्यांनी या विद्यार्थ्यांना सांगितले होते.

Leave a Comment