सर्वात छोट्या नावाचे गाव – ए


जगाच्या पाठीवर अनेक नावांची गावे आहेत. काही नवे खूप मोठी आहेत तर काही खूप छोटी. जगात सर्वात छोटे नाव असलेले गाव नॉर्वे स्वीडनला लागून असलेल्या लोफोटीन आयलंडचे आहे आणि हे आयलंड जगात प्रसिद्ध आहे. या आयलंड चे नाव आहे ए. हे नाव या आयलंडला जाणीवपूर्वक ठेवले गेले आहे. कारण येथील स्थानिक भाषेत या अक्षराचा अर्थ आहे नदी. गावाबाहेरच्या रस्त्यावर या नावाचा बोर्ड लागला आहे आणि पर्यटक या गावाला आवर्जून भेट देतात.

असे सांगतात की गावाच्या नावाचा साईन बोर्ड अनेकदा गायब झाला आहे. त्यामुळे येथील स्थानिक प्रशासनाने गावाचे नाव ए लोफोटीन असे केले मात्र गावकऱ्यांनी ते नापास करून पुन्हा नुसते ए असेच नाव कायम केले. या आयलंडला निसर्गसौंदर्याचे वरदान लाभले आहे.

असे सांगतात की ब्रिटीश लेखक व व्यंगकारने २००४ साली तो ए पासून बी पर्यंत सायकल प्रवास करणार असल्याचे जाहीर करून सर्वाना कोड्यात टाकले होते. मात्र त्याने खरोखरच नॉर्वेतील ए पासून नोब्रास्का मधील bee नावाच्या गावापर्यंत प्रवास करून त्याचे म्हणणे खरे करून दाखविले. या प्रवासासाठी त्याला ३ महिने लागले होते.

Leave a Comment