सरला चौधरी – यात्रीगण कृपया ध्यान दे मागचा आवाज


भारतातील बहुतेक व्यक्ती कधी ना कधी रेल्वे स्थानावर गेली असेल. रेल्वे स्थानकावर सतत गाड्यांसंबंधीच्या सूचना दिल्या जात असतात. यात्रीगण कृपया ध्यान दे अशी सुरवात करून या सूचना दिल्या जातात. गेल्या दोन दशकाहून अधिक काळ अश्या सूचना देणारा आवाज आपल्या परिचयाचा झाला असेल मात्र या आवाजाची मालकीण कोण हे आपल्याला माहिती नसेल. हा आवाज आहे सरला चौधरी या महिलेचा. आता त्या रेल्वेत नोकरी करत नाहीत मात्र त्याचा आवाज आजही तितक्याच ताजेपणाने रेल्वे स्थानकांवर सूचना देतो आहे.

१९८२ मध्ये त्या रेल्वे मध्ये अनौन्सर म्हणून नोकरीला लागल्या मात्र हे पद तात्पुरते होते. १९८६ मध्ये हे पद कायम झाले. त्यांना या पदासाठी खूप काम करावे लागत असे कारण तेव्हा संगणक नसल्याने प्रत्येक स्टेशनवर जाऊन त्यांना घोषणा रेकोर्ड कराव्या लागत त्यात ३ ते ४ दिवस जात असत. वेगवेगळ्या भाषेत या घोषणा रेकोर्ड होत. रेल्वेच्या वेबसाईट नुसार सरला चौधरी यांनी १७ वर्षपूर्वी नोकरी सोडली मात्र त्यांचा आवाज स्टँडबाय म्हणून सेव्ह केला गेला तो आजही वापरत आहे.

Leave a Comment