येतोय ४० एमपी कॅमेऱ्यासह ह्युवाई पी २० स्मार्टफोन


चीनी स्मार्टफोन उत्पादक कंपनी वावे त्यांचा नवा स्मार्टफोन बाजारात आणत आहे. ह्युवाई पी २० नावाने हा फोन बाजारात येत असून त्याला ३ रिअर कॅमेरे दिले गेले आहेत. हे कॅमेरे ४० एमपीचे असल्याचे समजते. शिवाय खास सेल्फी साठी २४ एमपीचा कॅमेरा दिला गेला आहे. या कंपनीच्या कव्हरचे काम करणाऱ्या कंपनीने कव्हरचे फोटो लिक केले आहेत. त्यात तीन रिअर कॅमेरा सेटअप दिसत आहे. या कॅमेऱ्याचे लेन्स फाईव्ह एक्स हायब्रीड झूम करू शकेल..

हा फोन म्हणजे कंपनीच्या जुन्या व्हर्जन पी १० चे अपग्रेड व्हर्जन असल्याचे समजते. पी १० साठी २० व १२ एमपीचे दोन रिअर कॅमेरे व सेल्फीसाठी ८ एमपीचा कॅमेरा दिला गेला होता.

Leave a Comment