फक्त ८,९९९ रुपयात २० एमपीचा सेल्फी कॅमेरा असलेला स्मार्ट फोन


भारतीय बाजारात हाँगकाँगची स्मार्टफोन संपनी असलेल्या इंफिनिक्सने लो बजेट इनफिनिक्स हॉट एस३ (Infinix Hot S3) स्मार्टफोन लॉन्च केला असून हा फोन फ्लिपकार्टवर उपलब्ध आहे. ३ जीबी रॅम असलेल्या या फोनमध्ये २० एमपी सेल्फी कॅमेरा आहे. त्यासोबतच हा फोन तुम्हाला देतो ४००० मेगाहर्ट्झची बॅटरी देण्यात आली आहे. फक्त ८,९९९ रुपये ऐवढी या फोनची किंमत आहे.

९,९९९ रुपये ऐवढी या फोनची एमआरपी असली तरी तुम्हाला फ्लॅश सेलमध्ये १००० रुपयांचा डिस्काऊंट मिळणार आहे. या फोनचे फिचर्स पाहता एवढ्या कमी किमतीत मिळणारा तो सर्वात स्वस्त स्मार्टफोन आहे.

या फोनसाठी फ्लिपकार्टवर तुम्हाला खास ऑफर्स मिळतील. या फोनवर तुम्हाला १००० रुपयांचा डिस्काऊंट तर आहेच शिवाय अॅक्सिस बँक बझ क्रेडिट कार्डने याला खरेदी केल्यास ५ टक्के एक्स्ट्रा डिस्काऊंट मिळणार आहे. याला तुम्ही ४३७ रुपयांच्या मासिक ईएमआयवरही खरेदी करू शकता. या फोनचा पहिला फ्लॅश सेल १२ फेब्रुवारीला दुपारी १२ वाजता सुरू होणार आहे.

Leave a Comment