शेअर बाजारातील पडझडीमुळे गुंतवणूकदारांनी अवघ्या सेकंदात गमावले २.२४ लाख कोटी रुपये


मुंबई – भारतीय शेअर बाजारावर अमेरिकेतील शेअर बाजारातील पडझडीचा परिणाम झाला असून शेअर बाजार शुक्रवारी सकाळी सुरु होताच ५०० अंकांनी सेन्सेक्स तर १०० अंकांनी निफ्टी घसरला. गुंतवणूकदारांचे सुमारे २.२४ लाख कोटी रुपयांचे नुकसान शेअर बाजार सुरु होताच अवघ्या काही सेकंदांमध्ये झालेल्या या पडझडीमुळे झाल्याचे वृत्त ‘इकॉनॉमिक टाइम्स’ने दिले आहे.

शेअर बाजार शुक्रवारी सकाळी सुरु होताच ५०० अंकांनी घसरुन ३३, ८९२ पर्यंत खाली आला. तर निफ्टीतही जवळपास १५० अंकांनी घसरण झाली. अमेरिकी शेअर बाजारात गेले आठवडाभर झालेल्या तुफानी विक्रीचा थेट परिणाम जगभरातील शेअर बाजारांवर झाला आहे. अनेक वर्ष शून्याच्या आसपास असलेले व्याजदर वाढवण्याची प्रक्रिया अमेरिकेमध्ये सुरू झाली आहे. फेडरल रिझर्व्हचा हे व्याजदर तीन टक्क्यांपर्यंत भविष्यात वाढवण्याचा प्रस्ताव असल्यामुळे सरकारी कर्जरोख्यांवरील परतावा वाढणार असून महागाईही भडकण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

Leave a Comment