अनुचित व्यापार पद्धतींचा अवलंब केल्याप्रकरणी गुगलला १३६ कोटींचा दंड


नवी दिल्ली – भारतीय प्रतिस्पर्धी आयोगाने (सीसीआय) जगातील सर्वांत लोकप्रिय सर्च इंजिन गुगलला तब्बल १३५.८६ कोटींचा दंड ठोठावला असून गुगलवर भारतीय बाजारात सर्च रिझल्टमध्ये अनुचित व्यापार पद्धतींचा अवलंब केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. वर्ष २०१२ मध्ये याप्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली होती.

गुगलविरोधात मॅट्रिमनी डॉट कॉम matrimoney.com आणि कंझ्यूमर युनिटी अँड ट्रस्ट सोसायटीने तक्रार दाखल केली होती. सीसीआयने या तक्रारीवर सुमारे सहा वर्षांनी निर्णय दिला. आयोगाने हा दंड स्पर्धाविरोधी वर्तणुकीप्रकरणी ठोठावला.

आपली स्थिती ऑनलाइन सर्चमध्ये मजबूत असल्याचा दुरूपयोग करत पक्षपातीपणा आणि अफरातफरी सर्चमध्ये केल्यामुळेच प्रतिस्पर्धी कंपन्या आणि ग्राहकांचे नुकसान झाल्याचा गुगलवर आरोप होता. सीसीआयच्या आदेशानुसार, दंडाची रक्क्म १३५.८५ कोटी रूपये असून आर्थिक वर्ष २०१३, १४ आणि १५ मध्ये भारतात कंपनीने मिळवलेल्या महसूलाच्या ५ टक्के इतकी ही रक्कम आहे. साठ दिवसांच्या आत ही रक्कम जमा करण्याचे आदेश गुगलला दिले आहेत.

Leave a Comment