व्हॅलेंटाईन डे निमित्ताने वनप्लस ५ टी लावा रेडवर सवलत


मुंबई – वनप्लस या चिनी कंपनीने व्हॅलेंटाईन डे निमित्ताने आपल्या वनप्लस टी लावा रेडसाठी विशेष सवलत जाहीर केली असून हा स्मार्टफोन ११ फेब्रुवारीपर्यंत अॅमेझॉनवरून एसबीआय पेडिट कार्डच्या साहाय्याने खरेदी केल्यास १५०० रुपयांचा तत्काळ डिस्काऊंट देण्यात येईल. याव्यतिरिक्त ३ महिन्यांसाठी नो कॉस्ट ईएमआयचा पर्याय निवडता येईल. त्याचबरोबर वनप्लस ५ टीमधील सर्व मॉडेलमध्ये नो कॉस्ट ईएमआयची सुविधा देण्यात आली. याव्यतिरिक्त ७ ते २१ फेब्रुवारीपर्यंत कोणत्याही ग्राहकाने वनप्लस ५ टी स्मार्टफोन खरेदी केल्यास रेफरल कोडचा वापर केल्यास रेफरर अथवा रेफरी यांना ३ महिन्यांच्या अतिरिक्त ब्रॅन्ड वॉरन्टी देण्यात येईल. दोन अथवा अधिक वेळा वापरल्यास ६ महिन्यांची अतिरिक्त वॉरन्टी मिळेल.

Leave a Comment