एक सो एक महागड्या गाड्या एकाच छताखाली खाताहेत धूळ


अमेरिकेतील टेनेसी स्टेटमधील मँफीस शहरात एका फोटोग्राफरने पार्किंग लॉटच्या सर्वात वरच्या मजल्यावर पार्क केलेल्या जगातील एक सो एक महागड्या गाड्या धूळ खात पडल्याचे फोटो काढले आहेत. हे गॅरेज नक्की कुणाचे आहे व या गाड्यांचा मालक कोण हे अजून समजलेले नाही. हे एखादे सिक्रेट गॅरेज असावे असा अंदाज केला जात आहे.

या इमारतीत अनेक ऑफिसेस व कारपार्क आहे. येथील रेगेअर या फोटोग्राफी कंपनीत काम करणारा एक फोटोग्राफर लंच टाइममध्ये सहज फिरत फिरत सर्वात वरच्या मजल्यावर गेला तेव्हा त्याला अनेक महागड्या गाड्या येथे पार्क असल्याचे व त्यावर धूळ बसली असल्याचे दिसले. विशेष म्हणजे येथे एकही गार्ड नव्हता. या फोटोग्राफरने येथले फोटो काढले.

येथे असलेल्या गाड्यात दीड कोटी किमतीची लोम्बार्गिनी, याच किमतीची दुर्मिळ जग्वार प्रोजेक्ट ७ मधली कारही आहे. या कारची फक्त २५० युनिट बनविली गेली होती. याशिवाय ३२८ जीएसटी सह अर्धा डझन फेरारी, अल्फा रोमियो ४ सी, अॅस्टन मार्टिन वेन्तेज एस, पोर्शे ९९१ जीटी ३ आरएस अश्या गाड्याही आहेत. या गाड्यावर कुठे कुठे हाताचे डाग व भरपूर धूळ आहे. या सिक्रेट गॅरेजला कुलूप नाही.

Leave a Comment