हा आहे अतिश्रीमंतांचा सिक्रेट क्लब


जगातील जानेमाने श्रीमंत कुठे मौजमस्ती करतात याच्या बातम्या नेहमीच आपल्या वाचनात असतात मात्र या लोकांसाठी काही गुप्त जागाही असतातच त्याची माहिती सहसा कुणाला कळत नाही. जर्मनीतील म्युनिक येथे जमिनीखाली असाच एक क्लब आहे मात्र त्याचे नक्की लोकेशन क्लब सभासदांशिवाय कुणालाच सांगता येत नाही. या क्लबचे सदस्य होण्यासाठी वर्षाला ८ कोटी रु. फी भरावी लागते असे सांगितले जाते.


या क्लबचे काही फोटो नुकतेच लिक झाले आहेत. येथे कोणत्या सुविधा पुरविल्या जातात ते स्पष्ट झाले नसले तरी त्या व्हीव्हीआयपी असणार असा तर्क कुणीही करेल. मिळालेल्या माहितीनुसार येथे सदस्यांना यायचे असेल तर खासगी जेट पुरविले जाते. येथे काम करणाऱ्या महिला वेट्रेससाठी अनेक नियम आहेत. पहिला म्हणजे या वेट्रेसचे वजन ५८ किलो पेक्षा जास्त असता कामा नये तसेच त्या देखण्या हव्यातच पण उंची किमान ५ फुट ७ इंच हवी.

या वेट्रेस येणाऱ्या पाहुण्यांशी आपण होऊन बोलू शकत नाहीत. पाहुणा बोलला तरच त्यांनी बोलायचे असते. येथे मद्य सोन्याच्या बाटल्यामधून पुरविले जाते. येथील सजावट एखाद्या लग्झरी बार प्रमाणे आहे. या क्लबविषयी अनेक अफवा आहेत मात्र येथे नक्की काय काय घडते हे कुणीच सांगत नाही.