मालदीव – पर्यटकांचा स्वर्ग


सध्या मालदीव या छोट्याशा देशात राजकीय उलथापालथ सुरु आहे व राष्ट्रपती यामीन यांनी आणीबाणी जाहीर केली असली तरी हा देश पर्यटकांसाठी नेहमीच स्वर्ग ठरला आहे. चार लाख लोकसंख्या असलेल्या या देशाला २०१७ मध्ये वर्षभरात १२ लाख पर्यटकांनी भेट दिली आहे. अन्य देशांपेक्षा स्वस्त आणि लग्झरी सुट्टी एनजॉय करण्याची संधी येथे पर्यटकांना मिळते.

११९२ छोट्या छोट्या बेटांनी बनलेल्या या देशात सुन्द अशी ३२ प्रवाळ बेटे आहेत. सर्व बेटांवर जाताना फेरी बोटींचा वापर केला जातो. पर्यटन हा येथला मुख्य उत्पन स्रोत आहे. देशाची अर्थव्यवस्था यावरच प्रामुख्याने अवलंबून आहे. चारीबाजूंनी पाण्याने वेढलेला हा देस पाण्यातील साहसी पर्यटनासाठी विशेष प्रसिद्ध आहे. पर्यटक पाण्यात मौज करू शकतात अथवा कॉटेज मध्ये आराम करू शकतात.


येथील प्रत्येक रिसोर्टमध्ये स्कुबा डायविंगची सुविधा आहे. स्कुबा डायविंगचे छोटे कोर्स पर्यटकांसाठी घेतले जातात. अंडरवाटर फोटोग्राफी करायची असेल तर त्यासाठी विशेष कॅमेरे हॉटेलकडून पुरविले जातात. येथील प्रवाळाची बेटे अतिशय सुंदर आहेत. समुद्राच्या तळाशी वसलेली आगळी दुनिया येथे पाहायला मिळते. त्यासाठी जर्मन पाणबुडी १०० फुट खोल समुद्रात नेते.


व्हेल आणि डॉल्फिन पाहण्यासाठी जगातील जी सर्वोत्तम ठिकाणे आहेत त्यातील पहिल्या पाचात मालदीवचा नंबर आहे. येथे या माश्यांच्या २० प्रजाती सापडतात. त्यात ब्ल्यू व्हेल या जगातील सर्वात मोठ्या माशापासून सर्वात छोट्या स्पिनर डॉल्फिन पर्यंत अनेक माश्यांचा समावेश आहे. येह्त जाण्यासाठी मार्च ते नोव्हेंबर हा चांगला काळ आहे. ३० दिवसांचा विसा ऑन अरायव्हल दिला जातो.

Leave a Comment