फोर्ब्जने प्रथमच जाहीर केली क्रीप्टो करन्सी श्रीमंत यादी


फोर्ब्जने प्रथमच क्रीप्टो करन्सी होल्डर्स श्रीमंत यादी जाहीर केली असून यात रीप्पल कंपनीचा सहसंस्थापक क्रिस लार्सेन पहिल्या क्रमांकावर आहे. त्याच्याकडे क्रीप्टो करन्सी स्वरुपात ८ अब्ज डॉलर्स म्हणजे ५१ हजार कोटी रुपये आहेत. या यादीत ४०० श्रीमंताचा समावेश आहे. त्यात ६७ अमेरिकन आहेत. या यादीत फोर्ब्जने ४२ वर्षावरील श्रीमंतांचा समावेश केला आहे.

क्रीप्टो करन्सी मध्ये बिटकॉइन, इंथेम, एक्सआरपी या करन्सीवर गुंतवणूकदारांनी अधिक विश्वास दाखविला असल्याचे समोर आले आहे. पहिल्या पाच श्रीमंतात लार्सेन नंतर दोन नंबरवर जोसेफ ल्युबिन ५ अब्ज डॉलर्स, चेंग पेंग झाओ २ अब्ज, कॅमेरन १.१ अब्ज डॉलर्स व मॅथ्यु मेलन १ अब्ज डॉलर्स यांचा समावेश आहे. या यादीत समाविष्ट असलेल्यांकडे ३५० दशलक्ष डॉलर्स क्रीप्टो करन्सी स्वरुपात आहेत. सध्या जगात १५०० क्रीप्टो करन्सी असून त्यांचे मूल्य ५०० अब्ज डॉलर्स आहे. भारतात क्रीप्टो करन्सी लीगल नाही.

Leave a Comment