कोणत्या राशीसाठी कोणते पोशाख योग्य…


एखादा ड्रेस निवडताना दर वेळी तुमची पसंती फ्लोरल पॅटर्नलाच का मिळते, किंवा एखादी स्टाईल तुम्हाला का पसंत पडते याचा विचार तुम्ही कधी केला आहे का? कदाचित तुम्हाला ठाऊक नसेल, पण तुमची रास कोणती आहे, या वर देखील तुमच्या पोशाखांची निवड अवलंबून असते. तुमच्या राशीचा परिणाम तुमच्या व्यक्तित्वावर पडत असतोच, पण त्याशिवाय तुमच्या आवडी-निवडीवर देखील पडत असतो. सूर्यराशींच्या हिशोबाने तुमच्या राशीकारिता तुमचा पोशाख कसा असेल, याबद्दल थोडेसे.

मेष राशीच्या महिला ‘ ट्रेंड सेटर ‘ असतात. ह्या महिलांना स्वतःची खास स्टाईल असते. त्या कोणत्याही फॅशन ट्रेंडच्या आहारी न जाता स्वतःच्या पसंतीने स्वतःसाठी पोशाख आणि अॅक्सेसरीज निवडतात. बोल्ड कलर्स आणि स्ट्रकचर्ड आकार ही त्यांची खास पसंती असते. आपल्या फॅशन सेन्स साठी नावाजलेली प्रसिद्ध आभिनेत्री कंगना रानौत मेष राशीची आहे. वृषभ राशीच्या महिलांना पेस्टल, किंवा हलके रंग आवडतात. त्यांच्या पोषाखाच्या स्टाईलची निवड ‘ फेमिनीन’ असते. या राशीच्या महिलांना आपल्या पोशाखांमध्ये रोमँटिक डीटेलिंग हवी असते. म्हणूनच रफल्ड कॉलर्स आणि तलम पारदर्शक फॅब्रिक्स या महिलांना विशेष पसंत असतात. अभिनेत्री अनुष्का शर्मा वृषभ राशीची आहे.

मिथुन राशीच्या महिला मोकळ्या विचारांच्या असतात. यांचे पोशाख खुल्या आकाराचे, ‘क्वर्की’ प्रिंट्स असलेले असतात. या महिला आपला फॅशन सेन्स सुधारण्यासाठी सतत प्रयत्नशील असतात. त्यामुळे पोषाखापासून आभूषणांपर्यंत सर्वच बाबतीत अतिशय चोखंदळ असतात. स्टाईल दीव्हा सोनम कपूर मिथुन राशीची आहे. कर्क राशीच्या महिला तलम फॅब्रिक्स, ए लाईन ड्रेसेस आणि पेन्सिल स्कर्ट्स सारखे पोशाख पसंत करतात. अभिनेत्री प्रियांका चोप्रा कर्क राशीची आहे. सिंह राशीच्या महिलांना आपल्या पोशाखाचे प्रदर्शन करण्यास आवडते. अभिनेत्री जॅकलीन फर्नांडीस सिंह राशीची आहे.

कन्या राशीच्या महिला आपल्या पोशाखाच्या बाबतीत अतिशय चोखंदळ असतात. पोशाखातील बारिक सारीक गोष्टींबद्दल त्या जागरूक असतात. या महिलांना जास्त भडक रंग आवडत नाहीत. या महिला पेस्टल, किंवा न्युट्रल रंगाचे पोशाख जास्त पसंत करतात. अभिनेत्री करीना कपूर कन्या राशीची आहे. तूळ राशीच्या महिला ‘ मॅचिंग ‘ पोषाखांच्या बाबतीत काटेकोर असतात. अतिशय भडक रंग किंवा गच्च प्रिंट्स असेलेल्या पोशाखांपासून या महिला लांबच असतात. हलक्या रंगांच्या पोशाखांना या महिला जास्त प्राधान्य देतात. अभिनेत्री परिणीती चोप्रा तूळ राशीची आहे.

वृश्चिक राशीच्या महिला फिटिंगचे कपडे पसंत करतात. या महिलांना लाल, राखाडी, नेव्ही ब्लू, चंदेरी रंगांचे पोशाख जास्त पसंत असतात. ऐश्वर्या राय बच्चन वृश्चिक राशीची आहे. धनु राशीच्या महिला आरामदायक पोशाख जास्त पसंत करतात. त्यामुळे यांच्या संग्रही ढिले-ढाले, युनिसेक्स पोशाख असतात. गडद रंग या महिलांना विशेष आवडतात. अभिनेत्री दिया मिर्झा धनु राशीची आहे. मकर राशीच्या महिलांची स्टाईल ‘ क्लासिक ‘ म्हणता येईल. या महिलांना मॅक्सी, स्कर्ट्स अश्या पोषाखांच्या पेक्षा ट्राऊझर्स जास्त आवडतात. या महिला आपल्या पोशाखाबद्दल अतिशय ‘ केअर फ्री ‘ म्हणता येतील. अभिनेत्री विद्या बालन ह्या राशीची आहे.

कुंभ राशीच्या महिला ट्रेंडनुसार आपली फॅशन बदलणाऱ्या असतात. यांना लोक काय म्हणतील याची अजिबात चिंता नसते. त्यांच्या मनाला आवडेल त्याप्रमाणे त्या आपल्या पोशाखाची निवड करतात. अभिनेत्री कतरिना कैफ कुंभ राशीची आहे. मीन राशीच्या महिलांना सिल्क, शिफॉन, वेल्वेट सारखी मुलायम फॅब्रिक्स आवडतात. यांचे पोशाख अतिशय ग्लॅमरस असतात. मनाला प्रसन्न करणारे हलके रंग यांना आवडतात. तसेच यांना हिल्स घालणे देखील मनापासून आवडते. अभिनेत्री श्रद्धा कपूर मीन राशीची आहे.

Leave a Comment