मुलाला डीस्लेक्सिया ( dyslexia ) असल्यास…


लिहिता वाचताना मुलांना होणारी अडचण डीस्लेक्सिया चे लक्षण असू शकते. तसेच लहान लहान कामे करण्यातही या विकारामुळे अडथळे निर्माण होतात. डीस्लेक्सिया असणाऱ्या मुलांचा, एका पाठोपाठ एक अश्या अनेक सूचना दिल्या गेल्या, की प्रचंड गोंधळ उडतो. अश्या मुलांच्या आस पास राहणाऱ्या व्यक्तींना किंवा त्यांच्या पालकांना, मुलांना नेहमी कसे वागवायचे या बद्दल मनामध्ये संभ्रम असतो. डीस्लेक्सिया असणारी मुले अनेक बाबतीत सामान्य मुलांपेक्षा कमी असल्याने या मुलांमध्ये न्युनगंडाची भावना असते, आणि त्यांना आत्मविश्वास ही नसतो. त्यामुळे या मुलांवर वेळीच उपचार केले जाणे महत्वाचे आहे.

डीस्लेक्सिया हा विकार काही असामान्य नाही. आपण वाचयला शिकतो, तेव्हा ते शिकण्याची प्रक्रिया सुरुवातीला प्रत्येकासाठीच अवघड असते. डीलेक्सिक मुलांना अक्षरे, आणि ती अक्षरे उच्चारण्याची पद्धत समजण्यास कठीण जाते, त्यामुळे त्यांना वाचन करताना अडचण येते. सुरुवातीला ही अडचण आल्याने पुढे मुलांना वाचण्यासोबत लिहिण्यास ही अडचण होऊ लागते. त्यामुळे डीस्लेक्सिक मुलांना एकदा अक्षर ओळख आणि त्यांच्याशी निगडीत उच्चार, स्वर यांची पक्की ओळख करून दिली गेली, की बहुतेकवेळी लिहिण्या वाचण्यातल्या अडचणी दूर होतात. जर एखाद्या मुलाला डीस्लेक्सिया असल्याचे तुम्हाला जाणवले, तर त्या मुलाला तुम्ही नक्की मदत करू शकता.

डीस्लेक्सिक मुलांना पुस्तके वाचून दाखविताना त्यातील शब्दांच्या उच्चारणावर लक्ष द्या. शब्दांचे उच्चार आणि स्वर त्यांना लक्षात राहावेत, म्हणून पुन्हा पुन्हा वाचून दाखवा. जर शब्द खूप मोठा असेल, तर त्या शब्दाच्या फोडी करून तो शब्द सावकाश उच्चारा. हाताने टाळ्या वाजवून त्या तालावर तो शब्द उच्चारण्यास शिकवा. हे सर्व करताना मुलांची अडचण समजून घेण्याचा प्रयत्न करा. तुम्ही सांगितलेले सर्व काही त्यांच्या पटकन लक्षात येईल अशी अपेक्षा न ठेवता, सावकाशीने त्यांना प्रत्येक गोष्ट समजावून सांगा. या मुलांना वाचायला, लिहायला शिकविताना खूप सहनशक्ती ची आवश्यकता असते. त्यामुळे प्रत्येक वेळी थोडे थोडे करूनच तुम्हाला तुमचा शिक्षण प्रवास सुरु ठेवता येईल.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही