रोझ डे पासून व्हॅलेंटाईन डे पर्यंत.. असा साजरा करा आठवडा


दर वर्षी १४ फेब्रुवारी रोजी व्हॅलेंटाईन डे, सर्व जगभरामध्ये मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. सर्व प्रेमीजनांसाठी, त्यांचे त्यांच्या जोडीदारावर, आप्तेष्टांवर असलेले प्रेम व्यक्त करण्याचा हा दिवस. १४ फेब्रुवारीच्या एक आठवडा आधीपासूनच या सोहोळ्याची सुरुवात होत असते. या सोहोळ्याची सुरुवात रोज डे पासून होते आणि व्हॅलेंटाईन डे, म्हणजेच १४ फेब्रुवारी रोजी हा प्रेमसोहोळा समाप्त होतो. या आठवड्यामध्ये दर दिवशी लोक आपल्या आवडत्या लोकांना फुले, कार्ड्स आणि अनेक भेटी देतात. या आठवड्यातील प्रत्येक दिवस खास असतो. जगभरामध्ये साजऱ्या होणाऱ्या या संपूर्ण आठवड्याची वैशिष्ट्ये जाणून घेऊ या.

‘व्हॅलेंटाईन वीक’ ची सुरुवात होते रोझ डे पासून. या दिवशी प्रेमीजन आपल्या जोडीदाराला निरनिराळ्या रंगांचे गुलाबपुष्प देऊन आपल्या भावना व्यक्त करतात. हा दिवस केवळ प्रेमीजनांसाठी नाही, तर ज्या व्यक्तीबद्दल आपल्या मनामध्ये मैत्रीच्या, प्रेमाच्या भावना आहेत, त्या त्यांना दाखवून देण्याचा आहे. यामध्ये तुम्ही तुमची खास मित्रमंडळी, आई-वडील, शिक्षक यांना देखील फुले देऊन त्यांच्याबद्दल तुम्हाला वाटणारे प्रेम, आदर व्यक्त करू शकता.

दुसरा दिवस असतो ‘ प्रपोज डे ‘चा. आपल्या जोडीदाराजवळ आपल्या मनातील भावना व्यक्त करून त्यांना आपलेसे करून घेण्याचा हा दिवस. तिसरा दिवस आहे ‘ चॉकोलेट डे ‘. ह्या दिवशी आपल्या प्रिय जनांना चॉकोलेट देऊन आपल्या प्रेमभावना व्यक्त करण्याचा हा दिवस आहे. ह्या दिवशी दिली जाणारी खास चॉकोलेट आता ऑनलाईन देखील मागवता येणे शक्य झाले असल्याने दुकानांमध्ये जाऊन चॉकोलेट विकत आणण्याच्या त्रासापासून सुटका झाली आहे.

व्हॅलेंटाईन डे चा चौथा दिवस ‘ टेडी डे ‘ म्हणून साजरा करण्यात येतो. या दिवशी कपल्स एकमेकांना टेडी बेअर, किंवा तत्सम सॉफ्ट टॉइज भेट देतात. त्यानंतरचा पाचवा दिवस असतो ‘ प्रॉमिस डे ‘. आपल्या जोडीदाराला आपण कायम साथ देऊ असे वचन त्याला देण्याचा आणि तसेच वचन त्याच्याकडून घेण्याचा हा दिवस. त्यापुढील सहाव्या दिवसाला आलिंगन दिवस म्हणता येईल. आपल्या प्रियजनांची गळाभेट घेऊन त्यांच्या बद्दल आपल्या मनामध्ये असलेल्या भावना व्यक्त करण्याचा हा दिवस. आणि त्यानंतर येतो तो ‘ व्हॅलेंटाईन डे ‘. इटलीमधील रोमधील ख्रिस्ती धर्मगुरू असणाऱ्या सेंट व्हॅलेंटाईन यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ साजरा केला जाणारा हा दिवस आहे. या संताने संपूर्ण जगाला प्रेमाची शिकवण दिली, त्याचीच आठवण ठेवत व्हॅलेंटाईन डे साजरा केला जातो.

Leave a Comment