जगातील सर्वात शक्तिशाली रॉकेट स्पेसएक्सने केले लाँच


फ्लोरिडा – जगातील सर्वात शक्तिशाली ऑपरेटर रॉकेट म्हणजेच ‘फॅल्कॉन हेवी’ हे रॉकेट लाँच करून प्रसिद्ध व्यवसायिक एलोन मस्कच्या स्पेसएक्स कंपनीने इतिहास रचला आहे. फॅल्कॉन हेवी अवकाशात सोडलेले जगातील सर्वात पॉवरफुल रॉकेट ठरले आहे.

केनेडी स्पेस सेंटरमधून स्थानिक वेळेनुसार दुपारी ३.४५ (भारतीय प्रमाणवेळेनुसार बुधवारी पहाटे २.१५) वाजता रॉकेटचे यशस्वीपणे लाँच करण्यात आले. या संपूर्ण प्रक्रियेचे स्पेसएक्सने लाईव्ह कव्हरेज केले. रॉकेटच्या इंजिनाशी संलग्न असलेल्या फाल्कन ९ बूस्टर्सनी पृथ्वीवरील तीन वेगवेगळ्या साइट्सवर जाण्याचा प्रयत्न केला. दोन जागांवर हे बूस्टर्स यशस्वीरित्या लँड झाले आहेत. तर अटलांटिकमध्ये स्पेसएक्सच्या ड्रोन शिपवर उतरणाऱ्या कोर बुस्टर अजूनही तेथे लँड झालेला नाही. मानवांना मंगळावर पोहोचवण्याचे महत्वाकांक्षी स्वप्न पाहणाऱ्या मस्क यांचे हे रॉकेट म्हणजे त्या स्वप्नाच्या दिशेने पहिले पाऊल आहे.

Leave a Comment