बिटकॉइनची जोरदार घसरण


गतवर्षात म्हणजे २०१७ च्या अखेरी १९ हजार डॉलरचा विक्रमी टप्पा गाठल्यानंतर क्रीप्टोकरन्सी बिटकॉइन ची चांगलीच घसरगुंडी झाली असून त्याचा दर ६ हजार डॉलर्सच्या खाली आला आहे. १ महिन्यापूर्वी १७१५० डॉलर्सवर असलेला हा भाव ६५ टक्के घटून ५९२१ डॉलर्सवर आला असल्याचे लग्झमबर्ग आधारित क्रीप्टोकरन्सी एक्स्चेंज बिटस्टँप मधून समोर आले आहे.

बिटकॉइन मधील घसरण होण्यामागे भारतात नुकताच सादर करण्यात आलेला अर्थसंकल्प कारणीभूत ठरला आहे. बिटकॉइन गुंतवणुकीतून नफा मिळविलेल्या १ लाख गुंतवणूकदारांना आयकर विभागाने नोटीसा पाठविल्याचे कारणही त्यामागे आहे. तसेच अर्थमंत्री अरुण जेटली यांनी बिटकॉइन लीगल टेंडर मानले जाणार नाही व सरकार ग्यावर नियंत्रण आणण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे जाहीर केल्यानंतर आंतरराष्ट्रीय बाजारात त्याच्या किंमती घसरल्या आहेत.

केकीया कम्युनिटीचे प्रमुख अजय केडिया म्हणाले हे लक्षात घ्यायला हवे की बीटकॉइन ही कोणत्याची देशाची अधिकृत करन्सी नाही. कोणत्याही देशाच्या मुद्रेत काही आठवड्यात दुप्पट तिप्पट वाढ होत नाही. हि मुद्रा बहुतेक वेळा स्थिर असते करणा त्याचा वापर देवघेवीसाठी होत असतो. त्यामुळे बिटकॉइन सारख्या गुंतवणुकीत अस्थिरता असू शकते.

Leave a Comment