८४ टक्के भारतीय त्यांचे पासवर्ड जोडीदाराबरोबर शेअर करतात – सर्वेक्षण


मुंबई- मॅक्फीच्या अभ्यासातून ८४ टक्के भारतीय जोडीदाराबरोबर त्यांचे पासवर्ड शेअर करत असल्याचे समोर आले आहे. नोव्हेंबर २०१७मध्ये मुंबई, दिल्ली आणि बंगळुरूमध्ये ६०० लोकांचा सर्व्हे करण्यात आला. ही बाब या सर्व्हेतून समोर आली आहे. ७७ टक्के भारतीय लोकांना तंत्रज्ञान नात्यातील महत्त्वाचा भाग असल्याचे वाटत असल्याचेही या अभ्यासातून समोर आलं आहे.

८९ टक्के भारतीयांना नात्यामध्ये प्रायव्हसी महत्त्वाची असते असे वाटते. पण ८४ टक्के भारतीय लोक त्यांचे मोबाइल पासवर्ड, सोशल मीडिया पासवर्ड आणि पिन नंबर त्यांच्या जोडीदाराबरोबर शेअर करतात. आपल्या जोडीदाराशी खासगी माहिती शेअर करताना सतर्कता बाळगण्याचे आवाहनही केले आहे.

एका वक्तव्यात मॅक्फीचे उपाध्यक्ष व्यंकट कृष्णापूर यांनी म्हटले की, तंत्रज्ञान आणि अप्लिकेशनच्या माध्यमातून आज कनेक्टेड लाइफस्टाइलमध्ये रोजची कामें आणि ग्राहकांशी संपर्क केला जातो. आपण तंत्रज्ञानावर विश्वास ठेवतो तसेच अवलंबूनही आहोत. पण तरीही आपली खासगी माहिती त्यावर शेअर करू नका. गरजेपेक्षा जास्त माहिती सांगण्यापासून सतर्क राहायला हवे, असे त्यांनी म्हटले आहे.

Leave a Comment