हिऱ्यापासून बनलेल्या डिस्प्लेचे स्मार्टफोन लवकरच येणार


तंत्रज्ञानाच्या मदतीने आता लवकरच हिऱ्यापासून बनविलेल्या डिस्प्लेचे स्मार्टफोन बाजारात दाखल होणार असल्याचे समजते. खान डायमंड ग्लासने यासंदर्भात घोषणा केली असून या फोनसाठी २०१९ सालची प्रतीक्षा करावी लागेल. हे फोन अर्थातच खिशालाही भारी असतील असा अंदाज आहे.

आत्तापर्यंत अनेक मोबाईल कंपन्यांनी त्याच्या खास एडिशन बाजारात आणल्या आहेत. त्यावर सोने, चांदी, हिरे जडवून ते विकले गेले आहेत. मात्र खान डायमंड ग्लास नॅनो क्रिस्टल पॅटर्न लायनिंग ऐवजी क्रिस्टल मदतीने स्क्रीनच तयार करत आहे. हा स्क्रीन मजबूत असेलच पण तो सहजी डॅमेज होऊ शकणार नाही. स्क्रीन बनविण्यासाठी लागणारे हिरे प्रयोगशाळेत बनविले जाणार आहेत. पूर्वी कंपनीने डायमंड स्क्रीनचे फोन २०१७ मध्ये लाँच करणार असल्याचे जाहीर केले होते. मात्र त्याच्या काही टेस्ट अजुनी सुरु आहेत असे समजते. मुख्य म्हणजे स्क्रीन रीफ्लेक्शनवर काम सुरु आहे. कंपनीचे सीईओ आदमखान म्हणाले आम्ही वेंडर बरोबर काम करत आहोत. फोन बरोबर फिटनेस बँडवरही काम सुरु आहे.

Leave a Comment