लॅमिनेटेड आधारकार्ड वापरता? मग हे जरुर वाचा


आपल्याला अनेक कारणांसाठी आधारकार्ड वापरावे लागते. आधारकार्ड ही आपली ओळख आहे. मात्र जर आपण लॅमीनेशन केलेले अथवा स्मार्ट आधार कार्ड म्हणजे प्लास्टिक कार्डचा वापर करत असू तर हि माहिती आपल्याला हवी. युआयडीएआयचे सीईओ अजय भूषण पांडे याच्या म्हणण्यानुसार स्मार्ट आधारकार्ड बनविण्यासाठी ५० ते ३०० रुपयांपर्यंत खर्च होतो त्याची वास्तविक काही गरज नाही. कारण आधारकार्ड स्मार्ट केल्यास अथवा लॅमीनेट केल्यास त्यावरील क्यूआर कोड काम करणे बंद करू शकतो शिवाय आधारकार्ड वरील खासगी माहिती चोरी होऊ शकते. त्यामुळे आधारकार्डचा कोणताही एक भाग अथवा मोबाईल आधार हे पूर्णपणे वैध आहे.

यामुळे आधारकार्ड लॅमीनेट करणे टाळावे कारण जेथे आपण हे काम करू थेथून तुमची खासगी माहिती तुमच्या संमतीशिवाय अन्यत्र पोहोचू शकण्याचा धोका आहे. सामान्य आधारकार्ड कागदावर डाउनलोड करून ते वापरले अथवा मोबाईल आधार वापरले तरी ते ग्राह्य आहे. आपला आधार नंबर कोणत्याही परक्या व्यक्तीबरोबर शेअर करणे धोक्याचे आहे याची नोंद घ्यावी.

Leave a Comment