पुरुषांना व्हेलेंटाइन डे साठी खास ब्युटी टिप्स


प्रेमाचा उत्सव म्हणजे व्हेलेंटाइन डे आता आठवड्यावर येऊन पोहोचला आहे. या दिवसासाठी मुली महिला वर्ग खास सजतोच पण मुले आणि पुरुषांनाही स्मार्ट आणि सुंदर दिसावे असे वाटते. या व्हेलेंटाइन डे साठी काही खास ब्युटी टिप्स येथे दिल्या आहेत, त्या खास पुरुषवर्गासाठी आहेत. आजमावून तर पहा.

पुरुषांनी आपली त्वचा आरोग्यपूर्ण आणि स्वच्छ दिसण्यासाठी काळजी घेतली पाहिजे. यासाठी वेळापत्रक बनवा. केवळ क्लीनसिंग अथवा मॉईच्शराझर वापरणे पुरेसे नाही. ते चांगल्या दर्जाचे हवे. पुरुषवर्गाची त्वचा प्रदूषण, सिगरेट धूर, कारचा धूर व अन्य प्रदूषणामुळे महिलांच्या तुलनेत अधिक जाड व तेलकट होते. त्यासाठी चांगले फेशियल क्लिन्झर निवडायला हवे. डेड स्कीन काढून टाकण्यासाठी स्क्रबचा वापर जरूर करा.

चांगल्या दर्जाचे मॉईश्चरायझर वापरात ठेवले तर त्वचा कोरडी दिसणार नाही. त्वचेला खाज येत असेल तर दाट क्रीमचा वापर करा. फुटलेल्या ओठांकडे विशेष लक्ष द्या. चांगले लीपबाम त्यासाठी वापरू शकता. दाढी असेल तर ती स्वच्छ ठेवा. फेसवॉश, शाम्पूने धुवा व त्यानंतर बिअर्ड ऑइल नक्की वापरा.

Leave a Comment