इनफिनिक्सचा हॉट एस ३ बजेट स्मार्टफोन


हाँगकाँग येथील स्मार्ट फोन कंपनी इनफिनिक्सने त्यांचा नवा सेल्फी फोकस्ड स्मार्टफोन हॉट एस ३ नावाने भारतीय बाजारात आणला असून हा बजेटफोन आहे. १२ फेब्रुवारीपासून तो फ्लिपकार्टवर विक्रीसाठी येत आहे. हा फोन दोन व्हेरीयंट मध्ये आहे. ३ जीबी रॅम ३२ जीबी मेमरीसाठी ८९९९ रुपये तर ४ जीबी रॅम व ६४ जीबी मेमरीसाठी १०९९९ अश्या त्याच्या किंमती आहेत.

या फोनला अँड्राईड ओरिओ ८.० ओएस, ५.६५ इंची फुल एचडी बेजललेस डिस्प्ले, ग्राफिक साठी अँड्र्यू जीपीयू, फोटोग्राफीसाठी ऑटोफोकस एलईडी फ्लॅशसह १३ एमपीचा रिअर व सेल्फीसाठी २० एमपीचा फ्रंट कॅमेरा दिला गेला आहे. फोनला ४००० एमएएचची बॅटरी असून हा फोन फोरजी व्होल्टला सपोर्ट करतो.

Leave a Comment